21.9 C
Madhya Pradesh
January 29, 2026
Bundeli Khabar
Home » शिवजयंती निमित्ताने रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्साहवर्धक सहभाग
महाराष्ट्र

शिवजयंती निमित्ताने रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्साहवर्धक सहभाग

Bundelikhabar

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : चिल्ड्रन्स हेल्प अँड हेल्पेज फाउंडेशन, आर एम एस मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, आयसीयू, आयसीसीयू लाईफ मोनीटर्ड वेल व सायन हॉस्पिटल ब्लड बँक व मराठे शाही ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने, शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून भव्य रक्तदान व विनामूल्य आरोग्य तपासणी शिबीर, गोवंडी येथील इमारत क्र. १७ ब, संस्कृती सोसायटी, म्हाडा कॉलनी, गोवंडी, मुंबई येथे संपन्न झाले.

मराठे शाही ग्रुप व स्थानिक नागरिकांनी मिळून एकंदरीत ५१ युवकांनी रक्तदान केले व आरोग्य शिबिरात ३५० नागरिकांनी, डोळे तपासणी, ईसीजी, शारीरिक तपासणी करून घेतली. मराठे शाही ग्रुपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आनंदी वातावरणात शिबिर संपन्न केले. या शिबिराला, विशेष सहकार्य रक्तदान दाते, साई भाई रामपूरकर यांनी मार्गदर्शन केले होते तसेच संजय इंदप यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले.


Bundelikhabar

Related posts

समाजसेवी गौरीशंकर चौबे के जन्मदिन पर रुद्राभिषेक कार्यक्रम संपन्न

Bundeli Khabar

महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार निवड समितीची पुनर्रचना

Bundeli Khabar

लोगों में जागरूकता के लिए इंफोसेक फाउंडेशन ने किया साइबर सिक्योरिटी कांग्रेस का मुंबई में आयोजन

Bundeli Khabar
error: Content is protected !!