35.3 C
Madhya Pradesh
May 20, 2024
Bundeli Khabar
Home » राष्ट्रीय लोकअदालतला उत्तम प्रतिसाद
महाराष्ट्र

राष्ट्रीय लोकअदालतला उत्तम प्रतिसाद

लघुवाद न्यायालयात २४ प्रकरणे निकाली

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : राष्ट्रीय लोकअदालत कार्यक्रमाला मुंबईतील लघुवाद न्यायालयात उत्तम प्रतिसाद मिळाला असून मुंबई व वांद्रे असे मिळून एकूण २४ प्रकरणं निकालात निकाली काढण्यात आली. तसेच काही प्रकरणे मध्यस्थी लवादाकडे पुढील तडजोडीसाठी पाठवण्यात आली. त्यामुळे अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या खटल्यातील न्यायप्रक्रियेतील कार्याला या उपक्रमामुळे गती येत असल्याचे दिसून येत आहे.

लघुवाद न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश महेंद्र के. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोक अदालतीचे काम यशस्वीरित्या पार पडले. एम. एस. कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य न्यायाधीश एम. एन. सलीम व एस. एस. देशपांडे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश एस. बी. तोडकर, न्यायाधीश श्रीमती के. आर. राजपूत, न्यायाधीश श्रीमती एम. डी. कांबळे, न्यायाधीश डी. एस. दाभाडे व के. बी. कामगौडा, वकील सर्वश्री प्रदीप सी. नाईक, पंढरीनाथ भि. शेटे, डी. एम. टेलर, श्रीमती जॅक्लीन डिसिल्व्हा तसेच सामाजिक कार्यकर्ते सर्वश्री अशोक आर. शिंदे, रेखा मेहता, सतीश आर. के., नफीसा मुस्तफा शमीम यांनी काम पाहिले. या लोकअदालतीचे यशस्वी आयोजन प्रबंधक एन. डब्ल्यू. सावंत, अप्पर प्रबंधक निलम शाहीर, मीना शृंगारे, अतुल राणे व रश्मी हजारे यांनी केले.

Related posts

विश्वराज शुगर इंडस्ट्रीजची विस्तार योजना

Bundeli Khabar

डिसिफर लॅब्सने अल्पावधीत दिले १५० टक्क्यांनी परतावे

Bundeli Khabar

सैनी इंडिया का रिकॉर्ड प्रदर्शन

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!