23.5 C
Madhya Pradesh
January 29, 2026
Bundeli Khabar
Home » शेकडो महिलांचे संसार उध्वस्त करणाऱ्या मटका जुगार अड्ड्यावर कारवाई नाही
महाराष्ट्र

शेकडो महिलांचे संसार उध्वस्त करणाऱ्या मटका जुगार अड्ड्यावर कारवाई नाही

Bundelikhabar

सहा.पोलीस आयुक्त यांच्याकडे महाराष्ट्र पत्रकार उत्कर्ष संघाची थेट तक्रार

राकेश चौबे
मोहोणे : शेकडो महिलांचे संसार उध्वस्त करणाऱ्या मोहने लहुजी नगर येथील मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने सहा. पोलीस आयुक्त यांच्याकडे थेट तक्रार करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यापासून लहुजी नगर येथे बेकायदेशीर तसेच बंदी असलेला मटका जुगार अड्डा सुरू असून येथील जुगार खेळणार्यांचा येथील रहिवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. या जुगार अड्डयापासून जवळच आई अंबाबाई आई येडाई देवीचे मंदिर असून येथील भाविकांना मटका जुगार अड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या जुगार अड्ड्यावर दारुडे, चर्सी, गंजेडे जुगार खेळण्यासाठी येत असून येतील महाविद्यालयीन विद्यार्थिनी व महिलांना येथून ये जा करण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे. महिलांची व विद्यार्थिनींची छेडछाड होण्याची शक्यता आहे. हा जुगार अड्डा कायमस्वरूपी बंद करण्याकरिता महाराष्ट्र पत्रकार उत्कर्ष संघाचे अध्यक्ष संदीप शेंडगे यांनी थेट सहा. पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली असून चार दिवस उलटूनही या जुगार अड्ड्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

या मटका जुगार अड्ड्यावर नोकरदार वर्ग हातमजुरी करणारे मजूर छोटे व्यापारी तसेच बेरोजगार तरुण झटपट पैसे कमविण्याच्या नादात आपले कमवलेले पैसे जुगारावर गमावत आहेत पैसे गमावल्याने अनेकांना मनस्ताप होत असून अनेक जण नशेच्या आहारी गेले आहेत येथील मोलमजूरी करणारे गरीब नागरिक आपल्या पैसे या जुगार अड्ड्यावर हरत असल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे महिलांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत या जुगार अड्ड्यावर कारवाई करून महिलांचे संसार वाचविण्याची विनंती महाराष्ट्र पत्रकार उत्कर्ष संघाचे अध्यक्ष संदीप शेंडगे यांनी एका निवेदनाद्वारे सहा.पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

दोन दिवसात या मटका जुगार अड्ड्यावर कारवाई न झाल्यास ठाणे शहर आयुक्त यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र पत्रकार उत्कर्ष संघटनेचे अध्यक्ष संदीप शेंडगे, कार्याध्यक्ष सचिन बुटाला, सचिव संभाजी मोरे, संघटक अजय शेलार यांनी स्पष्ट केले आहे त्यामुळे या बेकायदेशीर मटका जुगार अड्ड्यावर पोलीस कधी कारवाई करतात याकडे संपूर्ण ठाणे जिल्ह्यासह कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या नागरिकांचे लक्ष लागले आहे.


Bundelikhabar

Related posts

एंजल वन ने घोषित किये पहली तिमाही के परिणाम

Bundeli Khabar

अकबर ट्रॅव्हल्सवर आयआरसीटीसीचे तिकीट एजंट बनून दरमहा ८०,००० रुपये कमवा

Bundeli Khabar

कैलाश मासूम को म्यांमार एम्बेस्सी से मिला ‘बुद्धा पीस अवार्ड’

Bundeli Khabar
error: Content is protected !!