23.7 C
Madhya Pradesh
September 11, 2026
Bundeli Khabar
IMG 20220303 WA0060
महाराष्ट्र

शेअर बाजार पुन्हा घसरला

Bundelikhabar

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : निर्देशांक सातत्याने अत्यंत अस्थिर अवस्थेत असताना निफ्टी १६५०० च्या खाली घसरला. सेन्सेक्स बंद होताना ३६६.२२ अंकांनी किंवा ०.६६% घसरून ५५,१०२.६८ वर आणि निफ्टी १०८ अंकांनी किंवा ०.६५% घसरून १६,४९८ वर बंद झाला. सुमारे १९६३ शेअर्स वाढले आहेत, १२७९ शेअर्समध्ये घट झाली आहे आणि ११६ शेअर्स अपरिवर्तित राहिले आहेत.

अल्ट्राटेक सिमेंट, एशियन पेंट्स, एचडीएफसी लाइफ, श्री सिमेंट्स आणि आयशर मोटर्स ह्यांची निफ्टीमध्ये सर्वाधिक घसरण झाली. ओएनजीसी, यूपीएल, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, विप्रो आणि टेक महिंद्रा ह्यांचा नफा वाढला.

कॅपिटल गुड्स आणि बँक १-२ टक्क्यांनी घसरले, तर एफएमसीजी आणि रियल्टी निर्देशांक प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी घसरले. धातू, माहिती तंत्रज्ञान, तेल, वायू, ऊर्जा निर्देशांक १-२ टक्क्यांनी वाढले. बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.६ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.३५ टक्क्यांनी वधारले. रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलर ७६.४८ बळकट झाला.


Bundelikhabar

Related posts

समाज के विशिष्ट लोगों को मिला राष्ट्रीय रत्न सम्मान

Bundeli Khabar

कॅन्सरग्रस्त रुग्णांसोबत “स्वामी”ची दिवाळी

Bundeli Khabar

पुलिस बिभाग में बड़ा फेरबदल

Bundeli Khabar
error: Content is protected !!