28.5 C
Madhya Pradesh
October 6, 2024
Bundeli Khabar
Home » मराठी वृत्तपत्र लेखक संघातर्फे ‘मराठी भाषा दिन’
महाराष्ट्र

मराठी वृत्तपत्र लेखक संघातर्फे ‘मराठी भाषा दिन’

राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचे पारितोषिक वितरणही होणार

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई व मराठी विचारधारा प्रतिष्ठान गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जन्मदिन व मराठी भाषा दिवस कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५:३० वाजता धुरू सभागृह दादर सार्वजनिक वाचनालय येथे करण्यात आले आहे. चित्रपट-नाट्य अभिनेत्री चिन्मयी सुमित, शिवसेना आरोग्य कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, मराठी अभ्यास केंद्राचे प्रा. दीपक पवार, उद्योजक प्रमोद घोसाळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

याच समारंभात राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात येणार असून, सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक म्हणून मनोरंजनकार का. र. मित्र स्मृती पुरस्कारासाठी तरुण भारत नागपूरच्या ‘दीपोत्सव’ या अंकाची निवड करण्यात आली आहे.

या समारंभात ‘मराठी माणसांची भाषिक जबाबदारी’ या विषयावर तरुण भारतचे मुख्य संपादक गजानन निमदेव आपले विचार मांडणार आहेत. या समारंभात ज्येष्ठ वृत्तपत्रलेखक दत्ताराम गवस आणि श्रीराम मांडवकर यांना २०२१ च्या जीवन गौरव पुरस्काराने तर ग्रंथालय चळवळीतील दिवंगत ज्येष्ठ कार्यकर्ते आणि दादर सार्वजनिक वाचनालयाचे प्रमुख कार्यवाह दत्ता कामथे यांच्या स्मरणार्थ वाचन चळवळीतील सेवाभावी कार्यकर्ता पुरस्कार अश्विनी पाठक यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच काही अंकांचा उत्कृष्ट व उल्लेखनीय अंक म्हणून पारितोषिक देऊन गौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला वृत्तपत्रलेखक, साहित्यिक, दिवाळी अंकांचे संपादक आणि मराठी भाषाप्रेमींनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांनी केले आहे.

Related posts

देश के उभरते चित्रकारों को बढ़ावा देने के लिए द हाट ऑफ आर्ट के साथ बॉलीवुड का समर्थन

Bundeli Khabar

नागपूरला होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार

Bundeli Khabar

ठाणे जिल्हा परिषदेत कार्यरत असणारे श्री.अजिंक्य पवार यांना बढती

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!