34.2 C
Madhya Pradesh
May 18, 2024
Bundeli Khabar
Home » ठाणे जिल्हा परिषदेत कार्यरत असणारे श्री.अजिंक्य पवार यांना बढती
महाराष्ट्र

ठाणे जिल्हा परिषदेत कार्यरत असणारे श्री.अजिंक्य पवार यांना बढती

प्रमोद कुमार/महाराष्ट्र
ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेत सामान्य प्रशासन विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कार्यरत असणारे श्री. अजिंक्य पवार यांना बढती मिळाली असून त्यांची परभणी जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती झाली आहे. प्रशासकीय कामाचा परिपूर्ण अभ्यास आणि अनुभव असल्याने अल्पकालावधीतच जि.प.च्या अनेक धोरणात्मक आणि प्रशासकीय निर्णयात त्यांनी मोलाची भूमिका बजावली।


१८ सप्टेंबर २०२० ला त्यांनी जिल्हा परिषदेत पदभार स्वीकारला. जेमतेम एक वर्षाच्या कालावधीत मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना मागील अनेक वर्षांपासून रखडलेली अनुकंपा भरती प्रक्रिया मार्गी लावून १३ अनुकंपाधारकांना सेवेत सामावून घेतले. तसेच शासनाने वेळोवेळी राबवलेल्या भरतीप्रक्रियेच्या प्रशासकीय कामकाजातही त्यांनी मोलाचे योगदान दिले।

त्याचबरोबर कोविड काळात कर्तव्यावर असताना जिल्हा परिषदेच्या काही कर्मचाऱ्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून मिळणारी ५० लाखांची मदत जलदगतीने मिळावी यासाठी त्यांनी शासनाकडे पाठपुरावा केला आणि कुटुंबियांप्रती सहानुभूती दाखवत त्यांना मदतही मिळवून दिली. तसेच सशस्त्र ध्वजनिधी संकलनातही पुढाकर घेऊन शालेय विद्यार्थ्यांकडून निधी संकलनाची पूर्वपारंपारिक पध्दत बदलून अधिकारी-कर्मचारी यांच्या सहकार्याने व त्यांच्याकडून निधी संकलन करुन सन २०१९ आणि २०२० चे उद्धिष्ट 100% साध्य केले. शासनाच्या नियमाप्रमाणे कर्मचाऱ्यांचा नियतकालिक बदल्या,नियमित पदोन्नत्या आणि कर्मचार्यांना सेवाकार्यकाळाप्रमाणे मिळणारे आश्वासित प्रगती/कालबध्द पदोन्नतीचे आर्थिक लाभही त्यांच्या कार्यकाळात कर्मचार्यांना मिळाले।

विशेषतः काही संवर्गांचे तांत्रिक प्रश्न दूर करुन सेवाविषयक अडचणी सोडविल्या.विशेष म्हणजे त्यांनी राज्याला सादर केलेले नागरी सुविधा केंद्र मॉडेल ग्राम विकास विभागाने स्वीकारला असून, राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये त्याची अंमलबजावणी होणार आहे. प्रशासनाची उत्तम जाण असणारी अधिकारी म्हणून श्री.अजिंक्य पवार यांची ओळख असून जिल्हा परिषदेतही त्यांनी सभा कामकाज सौहार्दपूर्ण व समन्वयाने पार पाडून त्यांच्या कामाचा ठसा उमटवला।

Related posts

डिसिफर लॅब्सने अल्पावधीत दिले १५० टक्क्यांनी परतावे

Bundeli Khabar

‘राइट टू लेफ्ट’ गाने के साथ एक बार फिर धूम मचाने आ रही हैं संदीप

Bundeli Khabar

नगरविकास मंत्रालय से 20 करोड़ रुपए निधी मंजूर

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!