36.7 C
Madhya Pradesh
May 5, 2024
Bundeli Khabar
Home » सामाजिक कार्यकर्ता व मानवी हक्क कार्यशाळेची सांगता
महाराष्ट्र

सामाजिक कार्यकर्ता व मानवी हक्क कार्यशाळेची सांगता

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : संकल्प संस्था आणि मैत्री संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय निवासी कार्यशाळेचे युसूफ मेहेरअली सेंटर, तारा गाव, पनवेल, रायगड या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारेख यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी उपस्थित प्रशिक्षणार्थींनी मुंबईतील विविध सामाजिक प्रश्नांवर आपले मत प्रदर्शित केले.

डॉ. जी. जी. पारेख यांनी आपण मुंबई मधील सर्व संस्था, संघटनांच्या माध्यमातून कसे काम कराययचे, सामाजिक कार्यकर्ते म्हणून या प्रश्नांवर एकत्र येऊन कसे प्रयत्न करू शकतो या विषयांवर खूप छान मार्गदर्शन केले.
या दोन दिवसीय कार्यशाळेमध्ये संकल्प संस्थेचे अध्यक्ष विनोद हिवाळे यांनी स्व-परिचय, आत्मपरीक्षण, संवाद कौशल्य, गटकार्य समुपदेशनाचे टप्पे, सामाजिक कार्यकर्त्यांची भूमिका या विषयांवर विविध खेळांच्या (ऍक्टिव्हिटीज) माध्यमातून साध्या सोप्या पद्धतीने प्रशिक्षणार्थींना मांडणी केली.

युसुफ मेहेरअली सेंटरचे कार्य, त्यांनी केलेल्या सामाजिक उपक्रमांची, वर्धा जिल्ह्यातील महात्मा गांधी आणि बा कुटी यांची प्रतिकृती पाहण्यास मिळाली आणि विभागातील आदिवासी पाड्यातील जीवनशैली, त्यांनी विविध वनस्पतींपासून बनवलेले साहित्य पाहण्यास मिळाले. उपस्थित प्रशिक्षणार्थींनी या दोन दिवसीय कार्यशाळेमध्ये खूप छान प्रतिसाद दिला. मैत्री संस्थेचे अध्यक्ष सुरज भोईर यांनी आभारप्रदर्शन आणि प्रशिक्षणाची सांगता केली.

Related posts

ऊषा मंगेशकर और जयकांत भाई हिरानी “राष्ट्रीय अभिमान पुरस्कार-2023” से सम्मानित

Bundeli Khabar

आयुष्मान कार्ड के नाम पर हो रही धांधली का भंडाफोड़

Bundeli Khabar

राज्यपाल के हाथों ग्लोबल वेलनेस अवार्ड से सम्मानित हुए विद्युत जामवाल और दर्शन कुमार

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!