22.4 C
Madhya Pradesh
October 6, 2024
Bundeli Khabar
Home » कैलास नगर वळपाडा येथील गुर्जो काढा मोफत वाटप शिबीराला मोठा प्रतिसाद
महाराष्ट्र

कैलास नगर वळपाडा येथील गुर्जो काढा मोफत वाटप शिबीराला मोठा प्रतिसाद

२५३ रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ!
भिवंडी : बालयोगी श्री सदानंद महाराज सिद्ध वनस्पती उपचार केंद्र संस्था द्वारा गणेशपुरी भिवंडी संचलित, नित्यानंद फार्मसी यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अत्यंत प्रभावी वनौषधी गुर्जो काढा मोफत वाटप शिबिराचे आयोजन गुरुकृपा फार्मसी चे मालक कु. प्रितेश अशोक पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी कैलास नगर वळपाडा येथे केले होते.

सदर शिबिराचे उद्घाटन समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष धर्मसेवक डॉ.श्री सोन्या काशिनाथ पाटील, दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागीय सचिव राज्यपाल सन्मानित डॉ.श्री. किशोर बळीराम पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या शुभप्रसंगी बालयोगी श्री सदानंद महाराज सिद्ध वनस्पती उपचार केंद्र संस्था तुंगारेश्वर चे अध्यक्ष श्री. पुरुषोत्तम पाटील (जुचंद्र) भिंवडी वळपाडा , कशेळी , कोपर ह्या गावातील बालयोगी श्री सदानंद महाराज सिध्द वनस्पती केंद्रातील सेवक वैध श्री अजित किसन मेहेर, सेवक वैध श्री. संतोष वारघडे,
सेवक वैध श्री. भरत पाटील, डॉ. सुनंदा अशोक पाटील, आरोग्य प्रतिनिधी श्री सदानंद शिकारी, श्री. संजय कृष्णा पाटील (माजी सरपंच ग्रामपंचायत वळ्,) सौ.वनिता अनिल पाटील ( ग्रामपंचायत सदस्य वळ) श्री.संदीप मनोहर पाटील( माजी ग्रामपंचायत सदस्य वळ) सौ.संगीता किशोर पाटील,सौ.अलका वारघडे, सौ.भाविका पाटील,श्री.अनिल पाटील, आदी मान्यवर व मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील रुग्ण उपस्थित होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून भिंवडी, कैलास नगर वळपाडा , कशेळी , कोपर ह्या गावातील बालयोगी श्री सदानंद महाराज सिध्द वनस्पती केंद्रातील सेवक वैध तथा प.पू.बाबाचे भक्त श्री अजित किसन मेहेर यांनी सन २०२० ते २०२२ या कोरोना काळात गुर्जो काढा व
इतर वनौषधी अनेक लोकापर्यत तत्परने पोहचण्याची सेवाकार्य केल्याबद्दल मान्यवरांच्या शुभहस्ते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

आरोग्य निरोगी राहावे यासाठी सध्या अशा शिबिरांची गरज आहे असे यावेळी समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष धर्मसेवक डॉ.श्री सोन्या काशिनाथ पाटील यांनी प्रत्यक्ष दैनिक स्वराज्य तोरण शी बोलताना सांगितले. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक
कु. प्रितेश अशोक पाटील, आरोग्य प्रतिनिधी श्री.सदानंद शिकारी व सर्व सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

Related posts

भिवंडी तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदी वृषाली भोईर यांची नियुक्ति

Bundeli Khabar

छत्रपति शिवाजी महाराज गौरव पुरस्कार से सम्मानित हुए क़ासिम हैदर क़ासिम

Bundeli Khabar

आमदार विश्वनाथ भोईर यांच्या कल्याण पश्चिम मतदार संघात विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरूच

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!