28.5 C
Madhya Pradesh
October 6, 2024
Bundeli Khabar
Home » मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून समित्यांची नियुक्ती
महाराष्ट्र

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून समित्यांची नियुक्ती

आशिष शेलार निवडणूक संचालन समितीचे अध्यक्ष

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आगामी मुंबई महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली असून निवडणूक संचालन समितीच्या अध्यक्षपदी आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जाहीरनामा समितीच्या अध्यक्षपदी खासदार पूनम महाजन यांची नियुक्ती करण्यात आली असून माध्यम विभाग समिती अध्यक्ष पदाची जबाबदारी आमदार अतुल भातखळकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चेनंतर निवडणुकीच्या दृष्टीने २५ समित्यांचे अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्त्या मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी शुक्रवारी रात्री उशिरा जाहीर केल्या. निवडणूक संचालन समितीत खासदार गोपाळ शेट्टी, पूनम महाजन, मनोज कोटक, किरीट सोमय्या हे निमंत्रक असून आमदार राहुल नार्वेकर, कालिदास कोळंबकर, नितेश राणे, प्रकाश मेहता हे सदस्य असतील.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेकडून घोषणांचा सपाटाच लावण्यात आलाय. त्यात ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांची मालमत्ता करमाफी असेल किंवा महापालिकेच्या अर्थसंकल्पातील अनेक घोषणा. तर दुसरीकडे भाजप शिवसेनेला घेरण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. आता भाजपनं मुंबई महापालिकेवर भाजपची सत्ता आणण्यासाठी जोरदार तयारी सुरु केलीय. त्या पार्श्वभूमीवर आज भाजपच्या एकूण २५ समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली यंदाची महापालिका निवडणूक भाजप लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

समितीचे नाव, प्रमुख आणि सदस्यांची नावे खालीलप्रमाणे :- निवडणूक संचालन समिती
आशिष शेलार (अध्यक्ष), राहुल नार्वेकर, कालिदास कोळंबकर, प्रकाश मेहता, नितेश राणे, पूनम महाजन, जाहिरनामा समिती
पूनम महाजन (अध्यक्ष), योगेश सागर (सचिव), सुनील राणे, आर. यू. सिंह, राजहंस सिंह, प्रभाकर शिंदे, प्रशासन समन्वय समिती
प्रवीण दरेकर, प्रसार माध्यम आणि समाज माध्यम समिती
अतुल भातखळकर (अध्यक्ष), राम कदम, अमरजीत मिश्रा, विवेकानंद गुप्ता, झोपडपट्टी संपर्क समिती
गोपाळ शेट्टी, आर. डी. यादव, तृप्ती सावंत, संसाधन समिती
मनोज कोटक, आरोपपत्र समिती
अमित साटम (अध्यक्ष), भालचंद्र शिरसाट, विनोद मिश्रा, बाह्य प्रसिद्धी समिती
पराग अळवणी, प्रसिद्धी सामुग्री व्यवस्थापन समिती
मिहिर कोटेचा, पराग शाह, बुथ संपर्क समिती
संजय उपाध्याय, निवडणूक आयोग संपर्क समिती
प्रकाश मेहता, कृपाशंकर सिंह, ज्येष्ठ कार्यकर्ता संपर्क समिती
भाई गिरकर, जाहीर सभा समिती
प्रसाद लाड, वॉर रुम समिती
प्रतिक कर्पे, ओबीसी संपर्क समिती
मनिषा चौधरी, उत्तर भारतीय संपर्क समिती
आर. यू. सिंह, जयप्रकाश ठाकूर, अमरजित सिंह, जयप्रकाश सिंह, ज्ञानमूर्ती शर्मा

Related posts

म्हाडा के रिपेयरिंग बोर्ड का तुगलकी फरमान,2010 से बकाया किराया चुकाएँ एम एच बी कालोनी वासी।

Bundeli Khabar

अक्सर चर्चा में रहने वाले आरटीओ साहब

Bundeli Khabar

ठाणे जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!