29.9 C
Madhya Pradesh
October 15, 2026
Bundeli Khabar
IMG 20220401 WA0001
महाराष्ट्र

श्री हिंगलाज माता चौकाचे लोकार्पण

Bundelikhabar

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भावसार सभागृह, परळ येथील चौकाचे नामकरण “श्री हिंगलाज माता चौक” असे करण्यात आले. भोईवाडा नाका येथून परळ नाका मार्गे परमार गुरूजी मार्गावर हिंगलाज माता चौकापर्यंत भावसार समाज सेवा संघ (भोईवाडा) यांच्या वतीने भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. या प्रसंगी भावसार बंधु-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकाचा लोकार्पण सोहळा शिवसेना आमदार अजय चौधरी यांच्या शुभहस्ते तसेच प्रयत्नकार शिवसेना मा. नगरसेविका सिंधुताई मसुरकर, माजी महापौर श्रद्धा जाधव, मा. नगरसेवक दत्ता पोंगडे, मा. नगरसेवक सचिन पडवळ, शिवसेना उपविभागप्रमुख पराग चव्हाण, शाखाप्रमुख अनिल गावकर तसेच भावसार समाज विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष नागेश निमकर, सचिव काशिनाथ बासुतकर, खजिनदार विजय बासुतकर, योगेश खेमकर, सुधीर पेटकर आणि मोहन कटारे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.


Bundelikhabar

Related posts

संजीवन म्हात्रे यांची अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन च्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती

Bundeli Khabar

भाजपामध्ये गेलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांची घरवापसी-जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या हस्ते प्रवेश

Bundeli Khabar

राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धा सांगलीत सुरू

Bundeli Khabar
error: Content is protected !!