28.7 C
Madhya Pradesh
October 15, 2026
Bundeli Khabar
IMG 20220115 WA0010
महाराष्ट्र

शिवसेना प्रणित न्यु हिंदुस्थान कामगार सेना, अर्जुनली युनिट च्या नाम फलकाचे अनावरण

Bundelikhabar

मोठ्या उत्साहात संपन्न!

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील
शिवसेना प्रणित न्यु हिंदुस्थान कामगार सेना, अर्जुनली युनिट च्या नाम फलकाचे अनावरण शिवसेना संपर्क प्रमुख मा.श्री.विष्णु चंदे व शिवसेना विभाग प्रमुख मा.श्री.सुभाष पाटिल यांच्या शुभ हस्ते नुकताच मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाले.

या शुभ प्रसंगी महाराष्ट्र राज्य कामगार नेते हर्षवर्धन साईवाला, सुभाष पाटिल, प्रदीप बोडके, सचिन गोंधळी व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सदर युनिट चे अध्यक्ष जीशान कासकर, उपाध्यक्ष आसिफ फंडोळे व युनिट चे इतर सदस्य व माथाडी,ट्रान्सपोर्ट, वाहतूक व जनरल कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी संपर्कप्रमुख श्री.विष्णू चंदे यांनी सर्व मालक व कॉन्ट्रॅक्टर यांना प्रसार माध्यमा द्वारे विनंती केली की स्थानिक सुपुत्रांना डावलून बाहेरच्यांना कामे देवू नये असे झाल्यास स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात उपासमारीची वेळ येईल, ती वेळ येवू नये म्हणून न्यु हिंदुस्थान कामगार सेना सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मैदानात उतरल्याशिवाय राहणार नाही, आणि याचे सर्वस्वी जबाबदार मालक किंवा कॉन्ट्रॅक्टर असतील याची नोंद घ्यावी,
अशी माहिती न्यु हिंदुस्थान कामगार सेना, ठाणे ग्रामिण जिल्हा प्रमुख दिलशाद शेख यांनी दिली.


Bundelikhabar

Related posts

अटाळी येथील इराणी वस्तीत चालतो मटका जुगार अड्डा

Bundeli Khabar

जवाहर ताराचंद कौल चौक का अनावरण सुनील शेट्टी, असलम शेख, गोपाल शेट्टी ने किया

Bundeli Khabar

पंचायत समिती भिवंडी चे सहाय्यक गटविकास अधिकारी श्री अविनाश मोहिते यांना भारत सेवा रत्न गोल्ड मेडल पुरस्कार प्रदान

Bundeli Khabar
error: Content is protected !!