29.4 C
Madhya Pradesh
May 5, 2024
Bundeli Khabar
Home » समाधानकारक पावसाने पाण्याची चिंता मिटली,भातसा धरणक्षेत्रात मुबलक पाणीसाठा
महाराष्ट्र

समाधानकारक पावसाने पाण्याची चिंता मिटली,भातसा धरणक्षेत्रात मुबलक पाणीसाठा

मुम्बई / उमेश जाधव
शहापूर-: गेल्या काही दिवसात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळं पाणी टंचाईची टांगती तलवार दूर झाल्यात जमा आहे. ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला भातसा धरणातून पाणी पुरवठा होतो. या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मागील काही दिवसांत चांगला पाऊस झाल्यामुळं धरणांतील पाणीसाठ्यातही मोठी वाढ झाली आहे. यामुळे यंदा पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे।

यह भी पढ़ें- चिंतन से हमेशा चिंता मुक्ति मिलती है: आचार्य श्री विद्यासागर जी महाराज

शहापूर तालुक्यातील भातसा धरणाची एकूण पाणी साठवण्याची क्षमता ही ९४२ दशलक्ष घनमीटर आहे. तर आजघडीला ७८० दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा आहे. त्यामुळे धरणात सध्या ७९.१९ टक्के पाण्याचा साठा आहे।

आतापर्यंत भातसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १७१२ मिलीमीटर पाऊस झाला असल्याची माहिती उप कार्यकारी अभियंता योगेश पाटील यांनी दिली. यंदा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने सध्याच्या धारणातील पाणीसाठ्यामुळं पाणी टंचाईची
टांगती तलवार दूर झाल्यात जमा झाली आहे।

Related posts

मेक्सविन ह्यूमेन केयर फाउंडेशन द्वारा पुरस्कार सम्मान समारोह का आयोजन

Bundeli Khabar

राजभवन में पत्रकार सलामत अली सम्मानित

Bundeli Khabar

मुंबई प्रदेश भाजपा चित्रपट नाट्य आघाड़ी में डॉ ऋचा सिंह की उपाध्यक्ष पद पर नियुक्ति

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!