33.2 C
Madhya Pradesh
June 20, 2026
Bundeli Khabar
महाराष्ट्र

राष्ट्रवादी युवक काँग्रेस ठाणे जिल्ह्याची आढावा बैठक संपन्न

Bundelikhabar

प्रमोद कुमार

कल्याण :- आज ठाणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आढावा बैठक ठाणे येथे पार पडली. या बैठकीत ठाणे जिल्ह्यातील ६ महानगरपालिका व १८ विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी यांच्यासोबत येणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकी संदर्भात संघटनात्मक चर्चा करण्यात आली.

या बैठकीत युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब भाई शेख यांनी युवकांना मार्गदर्शन करताना युवक हाच उद्याच्या समाजाचे नेतृत्व करणारा घटक आहे, त्यामुळे जास्तीत जास्त युवकांना राष्ट्रवादी पक्षात आणून आपले विचार त्यांच्यामार्फत सामान्य जनतेपर्यंत पोहोवले पाहिजे. तसेच महेबुबभाई शेख यांनी सांगितले की नवनिर्वाचित अध्यक्ष सुधीर पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी युवक काँग्रेस ठाणे जिल्ह्यात जोमाने काम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच ठाणे जिल्हा निरीक्षक अभिषेक बोके साहेब यांनी मार्गदर्शन करताना युवकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. त्याचबरोबर आगामी काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेस ठाणे जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तसेच नवनिर्वाचित ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष सुधीर वंडारशेठ पाटील यांनी सांगितले की, आता काही महिन्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत पक्षश्रेष्ठी युवकांना मोठ्या संख्येवर सहभागी करून पक्ष मोठी जबाबदारी आपल्या युवकांना देणार आहेत, युवक लोकप्रतिनिधी उद्याच्या समाजाचा विकास अधिक जलदगतीने करतील असा विश्वास वाटतो. त्यामुळे आपण सर्वांनी आता या नवीन वर्षाच्या पहिल्याच बैठकीत संकल्प करून कामाला लागले पाहिजे. तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता सोबत मी तळागाळात जाऊन काम करणार आहे. आपल्या सर्वांच्या साथीमुळे नक्कीच ठाणे जिल्ह्यात युवक संघटना उभारी घेईल असे मत सुधीर पाटील यांनी मांडले.

याप्रसंगी ठाणे शहराध्यक्ष विक्रम खामकर, नवी मुंबई अध्यक्ष अनु आंग्रे, मीरा-भाईंदर अध्यक्ष साजिद पटेल, भिवंडी अध्यक्ष आसिफ शेख, प्रदेश सरचिटणीस बिरू वाघमारे, प्रमोद सरोदे, कल्याण डोंबिवली समन्वयक प्रशांत नगरकर, विश्वास आव्हाड, उल्हासनगर अध्यक्ष नरेश साळवे आदी ठाणे जिल्ह्यातील पदाधिकारी, विधानसभा अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते.


Bundelikhabar

Related posts

एनव्हायरोनिक्सचे लोगो रीब्रँडिंग

Bundeli Khabar

‘राज्य सांस्कृतिक पुरस्कार’ निवड समितीची पुनर्रचना

Bundeli Khabar

अधिवेशनाला वादळी सुरुवात

Bundeli Khabar
error: Content is protected !!