31.9 C
Madhya Pradesh
May 19, 2024
Bundeli Khabar
Home » जिल्हा अग्रणी बँक तर्फे जिल्ह्यात अलिबाग मध्ये महा कर्ज मेळावा
महाराष्ट्र

जिल्हा अग्रणी बँक तर्फे जिल्ह्यात अलिबाग मध्ये महा कर्ज मेळावा

अलिबाग / गुरुदत्त वाकदेकर

वित्तीय सेवा विभाग, भारत सरकार आणि जिल्हा अग्रणी बँक, बँक ऑफ इंडिया रायगड तर्फे दिनांक ८ ऑक्टोबर, २००२१ रोजी कर्ज मेळाव्याचे आयोजन केले आहे., अलिबाग शहरातील सर्व सरकारी, खाजगी अणि सहकारी बँका यामध्ये सहभागी होणार आहेत. सदर कर्ज मेळाव्यामध्ये छोट्या व्यवसायिकांना मुद्रा योजनेअंतर्गत शिशु कर्ज, हातगाडी वाले, रस्त्यावर बसून व्यवसाय करणारे यांच्यासाठी प्रधानमंत्री स्वानिधी योजने अंतर्गत कर्ज, तसेच विविध msme आणि गृह कर्ज, वाहन कर्ज आणि शेतकऱ्यांना, मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांना, कुकुट पालन आणि दूग्ध व्यवसाय करणाऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत पीक कर्ज, NRLM आणि अलिबाग नगर पालिका भागातील बचत गटांना समुदाय कर्ज, नवीन व्यवसाय करु इच्छिणाऱ्या होतकरूंसाठी जिल्हा उद्योग मार्फत PMEGP, CMEGP या योजने अंतर्गत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
त्याच बरोबर महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागा मार्फत ३५% अनुदान असेलेले PMFME अंतर्गत कृषी कर्ज, तसेच नाबार्डचे कृषी पायाभूत कर्ज या बाबत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
याकरिता लागणारे कागदपत्र
१) अर्ज
२) आधार कार्ड किंवा पॅन कार्ड रेशन कार्ड
३)फोटो इत्यादी
कागदपत्रे घेऊन आपले खाते ज्या बँक शाखेमध्ये आहे त्या स्टॉलवर आपल्याला संबंधित कर्जाबद्दल अर्ज व मार्गदर्शन मिळेल.
कर्ज मेळाव्याचे ठिकाण –
क्षत्रिय समाज कार्यालय,
कुरुल, अलिबाग
वेळ सकाळी १० ते सायंकाळी ३ वाजेपर्यंत
तरी या सुवर्ण संधीचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपले व्यवसाय वृद्धिंगत करण्याचे जाहीर आवाहन जिल्हा अग्रणी प्रबंधक विजयकुमार कुलकर्णी यांनी अलिबाग परिसरामधील जनतेला केले आहे।

Related posts

वृत्तपत्र वाटप करणार्‍या युवकाची गगन भरारी

Bundeli Khabar

घर में सेंध लगाने वाले गिरोह के पांच लोगों को पुलिस ने किया गिरफ्तार

Bundeli Khabar

एयरक्राफ्ट रेस्टॉरेंट में मिलेगा खान पान और फिल्म देखने का आनंद

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!