26.5 C
Madhya Pradesh
July 28, 2026
Bundeli Khabar
IMG 20210913 WA00072
महाराष्ट्र

डोंबिवली पूर्व देसले पाडा येथील तळ + 4 मजली अनधिकृत इमारतीवर निष्कासनाची धडक कारवाई

Bundelikhabar

प्रमोद कुमार/महाराष्ट्र
कल्याण : कल्याण डोम्बिवली महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देशानुसार आणि विभागीय उपायुक्त सुधाकर जगताप यांचे मार्गदर्शनाखाली भारत पवार- सहाय्यक आयुक्त ई प्रभाग यांनी डोंबिवली पूर्व देसले पाडा येथील मनोज तिवारी व विशाल सिंग यांचे सर्वे नंबर 71 वरील तळ + चार मजल्याचे अनधिकृत बांधकाम निष्कासनाची धडक कारवाई आज केली. सदर कारवाई इ प्रभागातील अनधिकृत बांधकाम नियंत्रण पथक व मानपाडा पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या पोलीस बंदोबस्तात 4 कॉम्प्रेसर ब्रेकर व 2 गॅसकटर च्या साह्याने करण्यात आली।


डोंबिवली पश्चिम येथील ह प्रभागातही ,सम्राट चौक, पंडित दीनदयाळ रोड येथील साई केअर हॉस्पिटल समोर तळ +6 मजली अनधिकृत इमारतीवर निष्कासनाची धडक कारवाई आज करण्यात आली. सुहास गुप्ते-सहाय्यक आयुक्त,ह प्रभाग यांनी ह व ग प्रभागातील अनधिकृत बांधकाम नियंत्रण पथक व विष्णू नगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या पोलीस बंदोबस्तात चार कॉम्प्रेसर ब्रेकर व दोन गॅस कटरच्या सहाय्याने सदर कारवाई करण्यात आली. त्याच प्रमाणे सदर बांधकाम करणारे व जमीनमालक यांच्याविरुद्ध महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम व महाराष्ट्र नगररचना अधिनियम 1966 नुसार गुन्हा दाखल करण्याची कारवाई देखील करण्यात आली।


Bundelikhabar

Related posts

MCU का हिस्सा बनने के लिए शाहरुख से बेहतर भला और कौन हो सकता है! ख़ान इज़ ग्रेट : डॉ स्ट्रेंज (बेनेडिक्ट कम्बरबैच)

Bundeli Khabar

Adarsh ​XI, Panvel team became “Badshah”

Bundeli Khabar

डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरणी डॉ. निलम गोऱ्हे यांनी पोलिस अधिकारी आणि पिडीताच्या कुटुंबियांची घेतली भेट, आरोपींच्या विरोधात चार्जशीट लवकर दाखल करून पीडिताच्या शिक्षणाची व्यवस्था करा

Bundeli Khabar
error: Content is protected !!