34.2 C
Madhya Pradesh
May 18, 2024
Bundeli Khabar
Home » अॅड. निर्मला सामंत प्रभावळकर यांची जनसेवा वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट
महाराष्ट्र

अॅड. निर्मला सामंत प्रभावळकर यांची जनसेवा वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : निराधार, परावलंबी, हिंडते फिरते, अपंग, मुले असणारे, नसणारे, एकटे, मानसिक आजार असणारे, सर्व उपचारांचा काहीही उपयोग नसल्यामुळे केवळ दिवस कंठणारे, आर्थिकदृष्टय़ा सक्षम असणारे, मुले परदेशात असणारे या प्रत्येक गटाच्या गरजा वेगवेगळ्या असतात आणि म्हणून त्यांच्यासाठी निर्माण होतात वृद्धाश्रम. निवास, भोजन, वैद्यकीय सल्ला यांसारख्या सोयी उपलब्ध करून देणार्‍या वृद्धाश्रमांत वृद्धांना आवश्यक असणारी सुरक्षितता आणि मानसिक शांतता मिळते. वृद्धाश्रम कोण चालविते यानुसार सरकारी आश्रयावर चालणारे, धार्मिक, आध्यात्मिक संस्थांद्वारे चालविले जाणारे, ट्रस्टमार्फत चालविले जाणारे आणि व्यावसायिक संस्थांमार्फत चालविले जाणारे वृद्धाश्रम असतात. प्रवेशाच्या अटींवरून विचार केला तर फक्त पुरुषांसाठी, फक्त स्त्रियांसाठी किंवा दोघांसाठीही प्रवेश उपलब्ध असणारे असे वृद्धाश्रम आहेत. त्यापैकीच एक शासन मान्यताप्राप्त मालाड पश्चिम येथील जनसेवा वृद्धाश्रम.आजच्या वैयक्तिक स्वातंत्र्याच्या युगात प्रत्येक माणूस स्वत:चा निर्णय स्वत:च घेतो, त्यामुळे परस्पर संबंधांवरही परिणाम होतो. म्हणूनच, वयस्कांना स्वतःच्याच घरात उपर्‍यासारखं वाटू लागतं आणि जर त्यांनी आज त्यांना फटकारले आणि त्यांनी वाढलेल्या मुलांना शांत केले तर त्यांच्या अंत:करणात जे घडते ते नैसर्गिक आहे.

हेच दुरावलेलं घर, नातेसंबंध वृद्धाश्रमात कशाप्रकारे जपले जपले जातात किंवा निर्माण होतात हे पाहण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा, मुंबईच्या माजी महापौर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, सेंटर फॉर स्टडी ऑफ सोशल चेंज या स्वयंसेवी संस्थेच्या प्रमुख सल्लगार अॅड. निर्मला सामंत प्रभावळकर यांनी शासन मान्यताप्राप्त मालाड पश्चिम येथे असलेल्या जनसेवा वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी अॅड. निर्मला सामंत प्रभावळकर यांनी तेथील वृद्धांशी आपुलकीने, अगदी कन्येच्या नात्याने संवाद साधला. स्वयंपाकघर, स्वच्छतागृह, वैद्यकीय व्यवस्था त्याचप्रमाणे तेथील व्यवस्थापनाची पाहणी केली. जनसेवा वृद्धाश्रम अनेक वर्षे वृद्धांची सेवा उत्कृष्टरीत्या करीत असून वृद्धाश्रमाला लागणारे सहकार्य करण्याचे आश्वासन अॅड. निर्मला सामंत प्रभावळकर यांनी दिले. त्याप्रसंगी व्यवस्थापकांनी आणि वृद्धाश्रमातील ज्येष्ठांनी अॅड. निर्मला सामंत प्रभावळकर यांचे स्वागत केले. तेथील ज्येष्ठांना त्यावेळी फळे आणि बिस्किटांचे वाटपही करण्यात आले .

Related posts

“मृदगंध” पुरस्कारांचे शानदार सोहळ्यात वितरण

Bundeli Khabar

दिव्यांगों को रोजगार दिलाने के लिए आगे आया समर्थम ट्रस्ट

Bundeli Khabar

आईएएस अधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर को रायगढ़ का नया जिला कलेक्टर नियुक्त किया गया

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!