34.2 C
Madhya Pradesh
May 18, 2024
Bundeli Khabar
Home » ठाणे जिल्हा युवागट चाचणी कुस्ती स्पर्धा २०२१ कलानिकेतन मंडळ सभागृह कोनगाव येथे मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न
महाराष्ट्र

ठाणे जिल्हा युवागट चाचणी कुस्ती स्पर्धा २०२१ कलानिकेतन मंडळ सभागृह कोनगाव येथे मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न

युवागट चाचणी स्पर्धेत कोनगांव संघ सांघिक विजेता ठरला…

किशोर पाटील/महाराष्ट्र
भिवंडी : ठाणे जिल्हा तालीम संघआणि कलानिकेतन मंडळ कोनगांव आयोजित ठाणे जिल्हा तालीम संघाच्या युवा गट निवड चाचणी फ्रिस्टाईल/ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धा बुधवार दि.१सप्टेंबर २०२१ रोजी कलानिकेतन व्यायाम शाळा कोनगांव येथे मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाल्या.
सदर स्पर्धेचे उदघाटन कोनगावच्या सरपंच डॉ. रुपाली अमोल कराळे, श्री. वरुण सदाशिव पाटील गटनेता तथा नगरसेवक कल्याण डोंबिवली मनपा.श्री.गणपतराव पिंगळे पोलीस निरीक्षक-कोनगांव पोलीस स्टेशन, श्रीमती ऋतुजा युवराज पाटील, दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक श्री किशोर बळीराम पाटील यांच्या शुभहस्ते व ग्रामपंचायत सदस्य-श्री. अशोक म्हात्रे, भरत जाधव, जयंत टावरे, सौ. कृतिका पाटील, उज्वला कराळे, कविता भगत, मीना म्हात्रे, आशा भोईर, सविता किणी,विधानसभा क्षेत्र अध्यक्ष-प्रमोद पाटील,मजूर फेडरेशनचे संचालक- विजयानंद पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक-हनुमान म्हात्रे,महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे प्रतिनिधी गंगाराम ठाकरे महाराज,ठाणे जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष-सुरेशदादा पाटील, सरचिटणीस-प्रकाश गोंधळी, तालुका कुस्ती संघटनेचे अध्यक्ष-श्रीधर पाटील कोकण विभाग कुस्तीगीर संघाचे आणि कलानिकेतन मंडळाचे अध्यक्ष प्रा. विनोद हनुमान पाटील कोनकर आणि कल्याण डोंबिवली कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पंढरीनाथ ढोणे, सुभाष ढोणे, राजेश भगत, दिलीप पाटील, बबन पाटील, बारकू कराळे मुकेश पाटील, हरेश कराळे व आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
उदघाटन प्रसंगी वरुण पाटील यांनी सांगितले की, मी कलानिकेतन मंडळाचे अध्यक्ष आणि आमचे काका विनोद पाटील,सचिन कराळे,पंकज कराळे आणि सर्व खेळाडू यांनी माझ्याकडे वर्षभर आंतरराष्ट्रीय मॅट पाहिजे म्हणून पाठपुरावा केला आहे. या महिन्याच्या आत आपल्याला आंतरराष्ट्रीय मॅट देण्यात येईल असे सांगितले. आणि आपल्या व्यायामशाळेसाठी सोना बाथ आणि अन्य इतर साहित्य देण्यात येईल असे सांगून सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या।

कोनगांव पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री.गणपतराव पिंगळे साहेबांनी सांगितले की, मी स्वतः कुस्ती खेळलो आहे. ऑलिम्पिकमध्ये कुस्ती या खेळात आजपर्यंत सर्वात जास्त पदके मिळाली आहेत.टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशाला रविकुमार याने रौप्यपदक तर बजरंगी पुनिया याने कांस्यपदक जिंकून दिले आहे. आपल्या देशाला ऑलिम्पिकमध्ये कुस्ती या खेळात आपल्या ठाणे जिल्ह्याने ,महाराष्ट्राने सुवर्ण पदक जिंकून इतिहास घडविला तर सर्वात जास्त आनंद होईल. महाराष्ट्र केसरी युवराज पाटील यांची कन्या ऋतुजा युवराज पाटील (पोलीस उप निरीक्षक ) या कुस्ती स्पर्धेसाठी उपस्थित आहेत म्हणजे स्व. युवराज पाटील हेच आशिर्वाद देत आहेत असे सांगितले. तसेच सर्वांनी कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून काळजी घ्यावी. विजयी झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन करून पराभूत खेळाडू यांनी अजून मेहनत घ्यावी असे सांगून पुढील स्पर्धेसाठी कुस्तीगिरांना शुभेच्छा दिल्या.
४आणि ५ सप्टेंबर २०२१ रोजी इंदापूर पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या ३ ऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आज झालेल्या फ्रिस्टाईल आणि ग्रिकोरोमन स्पर्धेतून २० खेळाडूंची निवड झाली आहे. २० पैकी ६ खेळाडू सुवर्ण पदक जिंकून कोनगांव सांघिक विजेता ठरला आहे।


सर्व विजयी आणि उपविजयी खेळाडू यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले।स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ठाणे जिल्हा तालीम संघाचे पंच प्रा.श्रीराम पाटील, आंतरराष्ट्रीय पंच विकास पाटील, राष्ट्रीय पंच युवराज पाटील, सतिश म्हात्रे, राजेश कराळे, किसन भोईर, पंकज कराळे,विष्णू पाटील, श्रीराम धोंडल, दिपक ठाकरे,डॉ तपन पाटील,राजू चौधरी,नरेंद्र पाटील, सोन्या पाटील, मुकुंद मढवी, देविदास पाटील, यांनी पंच आणि तांत्रिक अधिकारी म्हणून काम केले।


स्पर्धेचे यशस्वी करण्यासाठी ठाणे जिल्हा तालिम संघाचे पदाधिकारी आणि कलानिकेतन मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेऊन स्पर्धा यशस्वी केल्या.
ग्रीकोरोमन स्पर्धेतील विजयी खेळाडू
1) 55 किलो प्रथम- कु. सागर काळूराम भोईर कोनगांव
2) 60 किलो प्रथम -भावेश जनार्दन चौधरी
3) 63 किलो प्रथम- ऋषिकेश कचरू पाटील
4) 67 किलो प्रथम- सागर कृष्णा डिंगोरे
5) 72 किलो प्रथम- सुधीर जनार्दन पाटील
6) 77 किलो प्रथम- पंकज आप्पा माळी
7) 82 किलो प्रथम- मोहीत बबन पाटील कोनगांव
8) 87 किलो प्रथम- बाळू मुनीलाल यादव
9) 97 किलो प्रथम- साहिल विजय पाटील कोनगांव
10) 130 किलो प्रथम- मंगेश आकाश पाटील
फ्रिस्टाईल स्पर्धेतील विजयी खेळाडू
1) 57 किलो प्रथम-अविष्कार कृष्णा मढवी कोनगांव
2) 61 किलो प्रथम – प्रणय बाळाराम पाटील कोनगांव
3) 65 किलो प्रथम-महेंद्र म्हात्रे नाऱ्हेन
4) 70 किलो प्रथम-मनिष विश्वास भोईर-नांदीठणे
5) 74 किलो प्रथम-प्रतिक भंडारी चौधरपाडा
6) 79 किलो प्रथम-जय बाळाराम पाटील कोनगांव
7) 86 किलो प्रथम-कल्पेश पाटील बुर्दूल
8) 92 किलो प्रथम-धनंजय पाटील साखरोली
9) 97 किलो प्रथम-आकाश म्हात्रे पिंपळास
10) 125 किलो प्रथम सुजित हरड सोनाळे,सर्व उपस्थित पाहुणे,
कुस्तीगीर, वस्ताद, मार्गदर्शक, प्रमुख पाहुणे, कुस्ती शौकीन आणि पंच व विशेष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार प्रा. श्रीराम पाटील यांनी मानले।

Related posts

मालदीव के राष्ट्रपति इब्राहिम मोहम्मद सोलिह दादा साहब फाल्के चित्रनगरी पहुँचे

Bundeli Khabar

सोनू मंडल पाच वर्षीय बालक हरविल्याची तक्रार भिवंडी शहर पोलिस ठाण्यात दाखल

Bundeli Khabar

वेब सीरीज़ ‘पंचरत्न” में दिखेगा नितिन इसरानी का धाकड़ अंदाज़, सच कर दिखाया एक्टर बनने का सपना

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!