30.2 C
Madhya Pradesh
October 17, 2026
Bundeli Khabar
IMG 20211229 WA0008
महाराष्ट्र

कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतला आढावा

Bundelikhabar

प्रमोद कुमार
ठाणे : कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी ठाणे जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचा सखोल आढावा घेतला. दरम्यान श्री. क्षेत्र मलंगगडचा कायापालट करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमांतून विविध विकास कामांचा आराखडा तयार करण्यात आला असून त्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विशेष कौतुक केले.

या आढावा बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील, जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, मुख्य लेखा व वित्तधिकारी सुभाष भोर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( सा.प्र.वि ) अविनाश फडतरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रामपंचायत ) चंद्रकांत पवार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

या आढावा बैठकीत खासदार डॉ. शिंदे यांनी ग्रामपंचायत, शिक्षण विभाग, सार्वजनिक बांधकाम, महिला व बाल विकास, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, लघुपाटबंधारे, स्वच्छ भारत मिशन आदि विभागांचा सविस्तर आढावा घेतला. तसेच १५ वा वित्त आयोगातर्गत करण्यात आलेली कामे त्याचबरोबर जनसुविधा आणि नागरीसुविधांच्या कामांचाही सखोल आढावा घेतला. यावेळी स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाच्या मार्फत जिल्ह्यातील सांडपाणी घनकचरा व्यवस्थापना बाबतचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी प्रलंबित कामे समन्वयाने पूर्ण करण्याच्या सूचना डॉ .शिंदे यांनी संबंधिताना केल्या.

तसेच खासदार डॉ.शिंदे यांनी मागील आढावा बैठकीत श्री. क्षेत्र मलंगगडच्या विकास कामांबाबतसूचना केल्या होत्या. त्यानुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी विभागप्रमुखांसमवेत प्रत्येक्षस्थळी भेट दिली होती. त्यानंतर प्रशासनाच्यावतीने तात्काळ क्षेत्र मलंगगडच्या विकासाबाबत सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे. प्रशासनाच्या या कामाबाबत खासदार डॉ.शिंदे यांनी समाधान व्यक्त करत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांचे विशेष कौतुक केले.


Bundelikhabar

Related posts

जब्बार’ च्या माणूसकीला व्हाट्सअप गृप चा ‘सलाम हिंदुस्मशानभूमिला मुस्लीम युवकाचा आधार, 51 हजारांचा मदतनिधी जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते सुपूर्द

Bundeli Khabar

द्वारिकामाई चैरिटी संस्था द्वारा ‘भिक्षा नही शिक्षा’ अभियान की पहल

Bundeli Khabar

सावरकरांचं ब्रेल लिपीतील साहित्य शाळेला भेट

Bundeli Khabar
error: Content is protected !!