22.4 C
Madhya Pradesh
August 31, 2026
Bundeli Khabar
IMG 20211221 WA00142
महाराष्ट्र

हाड गोठवणाऱ्या थंडीत टायगरचा शर्टलेस डान्स, कू वरील व्हिडीओचा नेटकऱ्यांमध्ये धुमाकूळ

Bundelikhabar

संतोष साहू/महाराष्ट्र,

मुंबई: सध्याचा मोस्ट फेव्हरिट, आणि आणि लाखाे तरूणींच्या हृदयाची धडकन असलेला अभिनेता टायगर श्राॅफ याची हाडे गोठवणाऱ्या थंडीतील नृत्याचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर धुमाकूळ घालीत आहे. टायगरसह सर्व स्टार्स तसेच नेटकऱ्यांमध्ये वेगाने लोकप्रिय झालेल्या “कू’ या स्वदेशी संदेश प्रसारण उपकरणावर टाकलेला हा व्हिडीओ झपाट्याने लोकप्रिय झाला असून “कू’वरील ही छायाचित्रे आतापर्यत लाखो प्रेक्षकांनी पाहिली व अनेकांना पाठवली आहे.
फिल्म इंडस्ट्रीत फिटनेसच्या बाबतीत अतिशय पॅशन असलेल्या जाॅन अब्राहम, विद्युत जामवाल, सोनु सुद, अक्षय कुमार या मोजक्या स्टार्समध्ये टायगर श्रॅाफचेही नाव घेतले जाते. पीळदार शरीरयष्टी, रूबाबदार व देखणे व्यक्तिमत्व असलेला टायगर श्रॉफ म्हणजे युवा पिढीचा हाॅटकेक अॅक्टर आहे. आपल्या भूमिकेसाठी कुठलीही कसुर न सोडणाऱ्या नव्या पिढीच्या कलावंतांमध्ये तो टाॅपवर आहे. आणि तेवढीचटाॅपवर आहे. “लोकांशी आपल्या भाषेत जुळा’ असी टॅगलाईन असलेली “कु’ हे माध्यम झपाट्याने लोकप्रिय होत आहे.

“कु’वर प्रसारित ध्वनीचित्रफितीत टायगर कडाक्याच्या थंडीत शर्टलेस उभा आहे.”गणपत’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचे हे फोटो आहेत. युकेमध्ये पडलेल्या कडाक्याच्या थंडीत टायगर चक्क शर्ट न घालता उभा आहे. “कु’वर त्याने पोस्ट केलेल्या या छायाचित्रांनी अनेकांना वेड लावले आहे. या छायाचित्रात बर्फही पडताना दिसत आहे. अशावेळी शर्ट न घालता फोटो काढणे हे धाडसाचेच काम आहे. टायगरसोबत जॅकी भगनानीही दिसत आहे. फोटोला कॅप्शन देताना टायगरने जॅकीला “बॉसमॅन’ म्हणले आहे. टायगर आणि जॅकीची मैत्री जुनीच आहे. टायगर ६ नोव्हेंबरपासून युकेमध्ये “गणपत’चे शूटिंग करण्यात गुंतला आहे. या सिनेमात टायगर कृती सेननसोबत दिसणार आहे. २०१४ मध्ये आलेल्या “हीरोपंती’ सिनेमातून या जोडीने आपला बॉलीवूड डेब्यु केला होता.


Bundelikhabar

Related posts

राइस एंड ग्रेन मिलिंग एक्सपो 2022 में सोना मशीनरी ने लिया हिस्सा

Bundeli Khabar

स्कूलों-संस्थानों को सौर ऊर्जा में सक्षम बनाने की पहल

Bundeli Khabar

ऑक्टोपस स्पेशल फोर्स के साथ अभिनेता अदिवि शेष की विशेष भेंट

Bundeli Khabar
error: Content is protected !!