पत्रकारितेतील डॉक्टरेट मिळवुन देण्यासाठी महाराष्ट्राचे राजदूत डॉ.मणिलाल शिंपी यांचे योगदान महत्वाचे :डॉ.किशोर पाटील
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातील पत्रकारांना ओळख पत्राचे वाटप!
भिवंडी : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तसेच दैनिक गावकरीचे पुणे अहमदनगर विभागीय प्रमुख माननीय श्री. विश्वासराव आरोटे यांना महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन भुवनेश्वर ओडीसा यांच्या वतीने जाहीर झालेला भारत सेवा रत्न गोल्ड मेडल पुरस्कार संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे राजदूत( ब्रँड अँबेसिडर ) तथा आर. एस. पी .ठाणे कल्याण युनिटचे कमांडर डॉक्टर मणिलाल रतिलाल शिंपी, दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागीय सचिव डॉक्टर श्री. किशोर बळीराम पाटील, स्वामीनारायण ट्रस्ट चे अध्यक्ष डॉक्टर श्री दिनेश भाई ठक्कर, आर एस पी अधिकारी श्री.जितेंद्र सोनवणे, ज्येष्ठ पत्रकार श्री. सुरजपाल यादव, यांच्या शुभहस्ते दैनिक स्वराज्य तोरण कार्यालय कैलासनगर वळपाडा भिवंडी येथे प्रदान करण्यात आला.
याच कार्यक्रमात त्यांचा यथोचित सन्मानही करण्यात आला. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या भिवंडी शहरातील पत्रकारांना संघाचे राज्य सरचिटणीस श्री. विश्वासराव आरोटे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या शुभ हस्ते ओळख पत्र वाटप करण्यात आले.
माझ्या बरोबर नेहमी सुख पंपदुःखात सदैव सोबत असणारे ,पत्रकार संघाच्या माध्यमातून विचारांची देवाण घेवाण करणारे समाज्याचे काहीतरी देणं लागतो ही भावना तंतोतंत पाळणारे दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.श्री. किशोर पाटील यांच्या मुळे ठाणे जिल्ह्यात अनेक उपक्रम राबविले जातात,त्यामुळे संघाचे नाव संपूर्ण महाराष्ट्रा बरोबर कोकण विभागात पसरले आहे.ते नेहमीच त्यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात यशस्वी झाले आहेत. पत्रकार संघाचे काम सध्या महाराष्ट्र,दिल्ली,बेळगाव, गोवा,व गुजरात या पाच राज्यात सुरू आहे,
त्यामुळे या संघटनेत एकूण २७००० सभासद जोडले गेले आहेत व अजुनही वाढ होत आहे, आपण सर्व या संघटनेत काम करत आहोत त्यामुळे एक सेवक म्हणून काम करा व आपल्याला मिळालेल्या संधीच सोनं करा,आपल्या संघात दैनिकात, इलेक्ट्रनिक मीडिया,सोशल मिडियात,व ईतर ठिकाणी काम करणाऱ्या माझ्या पत्रकार बांधवांच्या सुख दुःखात ही संघटना काम करीत आहे, गेल्या दोन वर्षात संपूर्ण महाराष्ट्रात मोठया प्रमाणात कोरोनाचा संसर्ग पसरल्या मुळे
आपल्या ३२५ पत्रकार बांधवांचा त्यामध्ये मृत्यु झाला, या वेळी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पुणे येथील कार्यक्रमात पत्रकारांना संरक्षण कवच मिळेल असे जाहीर केले होते, मात्र एकाही पत्रकाराला शासनाकडून मदत मिळाली नाही,व आपली फसवणूक केली, त्यामुळे राज्य सरकार वर आता पत्रकारांनी गुन्हा दाखल करण्याची वेळ आली आहे,कोरोना काळात आपण सर्व पत्रकारानी राज्य सरकारला सहकार्य केले,मात्र सरकारने शासकीय सेवेत असणाऱ्या कर्मचारी वर्गातील ज्या कर्मचाऱ्यांचा मृत्यु झाला त्यांना मदत केली, परंतु पत्रकाराना दिलेल्या आश्वासनाची कोणतीही पुर्तता केली नाही,म्हणुन पत्रकारांनाही आता शासनावर अवलंबून न राहता आपण ज्या संघटनेत काम करतो त्या संघटनेच्या कुटुंबाकडे लक्ष देणे काळाची गरज आहे, व या संघटनेतील कुटुंबाला देखील हातभार लागला पाहिजे हा एकमेव उद्देश समोर ठेऊन ज्या ३२५ पत्रकारांचा मृत्यू झाला त्यांना संघटनेच्या माध्यमातून आमच्या परीने यथायोग्य मदत केली ती मदत कितीही असो यापेक्षा संघटनेने दातृत्व दाखवले हे महत्त्वाचे आहे म्हणून पत्रकारांनी दाखविलेल्या समाजसेवेचा वारसा व त्यामधून एखाद्या पत्रकारांचा सन्मान होणे हा सन्मान देखील मोठा आहे, आज मला पुरस्कार देऊन जो माझा सन्मान केला त्यामुळे माझी आता नैतिक जबाबदारी वाढली आहे,तसेच महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन च्या सर्व पदाधिकारी व सन्माननीय डॉक्टर मणिलाल शिंपी साहेब यांचे मी संघटनेच्यावतीने आभार मानतो, मी गेल्या दोन वर्षापासून कमांडर मणिलाल शिंपी यांचे काम पाहतो ते खरोखरच वाखाण्याजोगी आहे आपण देखील समाजाचं काही देणं लागतो ही भावना मनात धरून उपेक्षित घटकांना समोर आणण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून करतो, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या राज्यस्तरीय अधिवेशन शनिवार दी.१८ डिसेंबर २०२१ रोजी ठाणे येथील गडकरी रंगायतन मध्ये आयोजित केले आहे त्यामागचा एकच उद्देश असा आहे की राज्यातील सर्व पत्रकार एकत्र जमा झाले की त्यांची ओळख निर्माण होते, व एखाद्या कठीण परिस्थितीत आपण गोव्याला गेलो अथवा गोव्या वरून मुंबई ला आले तर आपला पत्रकार त्या पत्रकाराच्या मदतीला धावून जातो अशा वेळी संघटना उपयोगी पडते,हाच उद्देश आहे,
पत्रकार संघाच्या 22 मागण्यांसाठी आम्ही आझाद मैदानावर आंदोलन केले होते त्या आंदोलनाची दखल राज्यपालांनी घेतली पत्रकारांना संरक्षण कायदा मंजूर केला तसेच पेन्शन योजना ही मंजुर केली अशाच प्रकारे केंद्र सरकारकडे देखील आम्ही पेन्शन योजनेची मागणी करणार आहोत म्हणून कोणत्याही संघटनेत कार्य करत असताना त्या कार्याची दखल संघटनेने घेतली पाहिजे आणि ती दखल घेतल्यानंतर आपल्या कार्याला उभारी देण्याचे काम या राज्य पत्रकार संघटनेच्या वतीने केला जातो. कोरोना काळात आमच्या पत्रकार बांधवानी देखील किराणा व धान्याचे वाटप केले, पत्रकारांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन जरी वेगळा असला तरी आम्ही मात्र ग्रामीण भागातील शेतकऱ्याचे सुपुत्र असल्यामुळे या समाजाचे काहीतरी देणे लागतो ही उदात्त भावना मनात असल्या मुळे रस्त्याने चालत जानाऱ्या वाटसरूना देखील किराणा वाटप केला. आमच्या इंदापूर तालुक्याचे अध्यक्ष नीलकंठ मोहिते यांनी दोन महिने जवळ जवळ एक कोटी रुपयांचा किराणा वाटप केला त्यामुळे तिथे असलेले मंत्री दत्ता भरणे त्यांनी त्याला सांगितले की तू निवडणूक लढवणार आहे का त्यांनी एकच सांगितले की वरचा देतो मी वाटपाचे काम करतो, पत्रकारांकडे जरी समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असला तरी तो वेगळा कसा करता येईल आपल्याला माणसे कशी जोडता येतील म्हणून आम्ही माणसे जमविण्याचे काम करतो जोडण्याचे काम करतो व माणसे जोडत असताना तो कोणत्या जाती धर्माचा आहे हे न मानता तो पत्रकार आहे, आणि पत्रकारांसाठी त्याच्या सुखात नाही तर दुःखात कसे उभे राहता येईल ही कल्पना आम्ही पत्रकार संघटनेच्या माध्यमातून साकारली आहे आपण सर्व ग्रामीण भागातील शहरी भागातील पत्रकार असलो तरी असा दुजाभाव न करता भविष्य काळामध्ये आपल्याला एकत्र येणे ही काळाची गरज आहे .पत्रकारिता करीत असताना आपल्या लेखनातून कोणाचे जीवन उद्ध्वस्त होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे त्यामुळे आपण जमिनीवर राहून काम करावं हवेत उडण्याचा प्रयत्न करू नये ही सर्वांना विनंती मला नको परंतु माझ्या इतर सहकाऱ्यांना मिळायला पाहिजे माझ्यापेक्षा माझा कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे अशी संकल्पना किशोरजी पाटील यांनी साकारली आहे त्यामुळेच आज मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित आहेत, त्यांच्या हातून यापुढेही असेच कार्य घडावे असे अध्यक्षीय भाषणात संघटनेचे सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी यावेळी सांगितले,
बऱ्याच अशा पत्रकार बांधवांच्या व्यथा समजून घेणारे आजचे सत्कारमूर्ती तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस श्री विश्वासराव आरोटे यांच्या भेटीची आम्हा आर एस पी अधिकारी युनिटला आतुरता होती बऱ्याच वेळा दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागीय सरचिटणीस डॉ.श्री. किशोर पाटील साहेब सांगायचे की आरोटे साहेबांना आपल्याला भेटायचं आहे काही बोलायचं आहे पण शेवटी काळ आणि वेळ ठरवत असतो तो दिवस आज उजाडला याठिकाणी आज महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, आरएसपी अधिकारी व समाजसेवक असा त्रिवेणी संगमाचा योग आला आहे व या तिघांची गरज समाजाला आहे, देशाला आहे तसेच शासनाला ही आहे, आज या ठिकाणी महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन च्या माध्यमातून सन्माननीय पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस श्री विश्वासराव आरोटे यांना भारत सेवा रत्न गोल्ड मेडल पुरस्कार दिला,
कोरोना काळात वृत्तपत्र छपाई, यंत्र ,बंद असतानाही आपले पत्रकार बंधु कोणत्याही प्रकारची चिंता न करता आपल्या कुटुंबाची ही पर्वा न करता ऑनलाईन का असेना घरापर्यंत बातमी पोचवत होते आज काय झालंय, काय घडलं, याची तंतोतंत माहिती सर्व भारतीय नागरिकांना देत होते. आणि हे करण्याची जबाबदारी लोकशाहीचा चौथा स्तंभ समजला जाणारा पत्रकार होय, व त्यांच्या लेखनी मध्येच धमक आहे, म्हणूनच आज संघाचे राज्य सरचिटणीस सन्माननीय विश्वासराव आरोटे यांना भारत सेवा रत्न गोल्ड मेडल पुरस्कार प्राथमिक स्वरूपात प्रदान केला हा पुढील कार्यक्रम गोहाटीला मोठ्या प्रमाणात होणार आहे,
तेथे यथोचित सन्मान करण्यात येईल मी १९९२ पासून पत्रकारिता करीत आहे नंदुरबार मधून लोकमत ,सकाळ या वर्तमानपत्रामध्ये लिखाण करत होतो माझ्या काही गुरुवर्य रमाकांत पाटील, अजय सकाळ,प्रा. दत्ता वाघ, संजय राजपूत यांच्या कडून मी बाळकडू घेऊन पत्रकारिता सुरु केली,
दैनिक सकाळ फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक प्रशिक्षण शिबिरांमध्ये सहभागी झालो त्यामुळे ग्रामीण भागातील काही समस्यांवर शोध पत्रकारिता कशी असते हे शिकलो शिक्षक असल्यामुळे लिखाणाची आवड होती लिखाणातून समाजापुढे आपले मत मांडत होतो ,१९९५ मध्ये महाराष्ट्र टाईम या दैनिकाने स्पर्धा आयोजित केली होती विषय होता (२१ व्या शतकातील युवकांची दशा आणि दिशा) या लेखावर मला महाराष्ट्र राज्याचा पत्रकार संघाच्या वतीने गौरव पुरस्कार मिळाला त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला ,ज्यांनी मला कधी बघितले नाही बातम्यांच्या माध्यमातून व्हाट्सअप द्वारे ओळख झाली व अशा परिस्थितीत जो कोणी विश्वास ठेवतो तो फक्त पत्रकार असतो,
संपादक डॉ.श्री. किशोर पाटील व तुमच्या सारख्या अनेक पत्रकारांनी आमच्या कार्याची माहिती प्रसिद्ध केली नसती तर आज मी महाराष्ट्र राज्याचा राजदूत (ब्रँड अँबेसिडर) झालो नसतो व सन्मानीय महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या शुभ हस्ते सन्मानित झालो नसतो,व त्यांच्या पर्यंत पोचवण्याचे मी सर्व श्रेय सन्माननीय संपादक डॉ.श्री. किशोर पाटील यांना देतो,असे या वेळीआपलें मनोगत व्यक्त करताना डॉ.श्री.मनीलाल शिंपी यांनी सांगितले, आजच्या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सन्माननीय सरचिटणीस विश्वासराव आरोटे आवर्जून उपस्थित राहून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल त्यांचे आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे सन्माननीय राज्यपाल यांच्या शुभहस्ते महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन भुवनेश्वर ओडिसा यांच्या वतीने पत्रकार क्षेत्रातील डॉक्टरेट मिळविण्याचा पहिला मान मला मिळाला याचे सर्व श्रेय मी महाराष्ट्र राज्याचे ब्रँड अँबेसिडर डॉक्टर श्री मणिलाल शिंपी साहेब यांना देतो, तसेच १८ डिसेंबर रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनासाठी आपण सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे असे आवाहन उपस्थित सर्व पत्रकारांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागीय सचिव तथा दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.श्री. किशोर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले तसेच वर्धापन दिनाच्या दिवशी आपल्या संघातील पत्रकारांना विशेष भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात येईल असे सांगितले, या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन ज्येष्ठ पत्रकार आचार्य सूरज पाल यादव यांनी केले,
या कार्यक्रमाला अरुण मिश्रा,श्रीनिवास सिरीमल्ली, लवलेश सुतार,सोमनाथ ठाकरे,जगदीश पताले,रेहान खान,ताज अन्सारी,एस,बी,अन्सारी,
निलम तिवारी,परवीन खान, रेश्माअन्सारी,राज पाठक,व आदी पत्रकार उपस्थित होते,

