19.5 C
Madhya Pradesh
November 15, 2026
Bundeli Khabar
IMG 20211204 WA0004
महाराष्ट्र

बर्फाच्या वर्षावात दिली ‘अशी’ पोज, टायगर श्रॉफचे हे धाडस बघितलेत का

Bundelikhabar

संतोष साहू/महाराष्ट्र,

मुंबई: टायगर श्रॉफ म्हणजे तरुणांच्या मोस्ट फेवरिट अभिनेत्यांपैकी एक आपल्या भूमिकेसाठी कुठल्याही टोकाला जात कष्ट घेणाऱ्या नव्या पिढीच्या कलावंतांपैकी एक म्हणून तो ओळखला जातो. त्याची ही ओळख ठळक करणारे फोटोज सध्या व्हायरल होत आहेत. यात टायगर शर्टलेस उभा आहे, तेही एकदम कडाक्याच्या थंडीत. गणपत सिनेमाच्या शुटिंगदरम्यानचे हे फोटो आहेत. युकेमध्ये पडलेल्या कडाक्याच्या थंडीत टायगर चक्क शर्ट न घालता उभा आहे. कू वर त्याने पोस्ट केलेल्या या फोटोजनी अनेकांना आश्चर्यचकित केले आहे. या फोटोजमध्ये बर्फ पडतानाही दिसतो आहे. अशावेळी शर्ट न घालता फोटो काढणे हे धाडसाचेच काम आहे.

फोटोजमध्ये टायगरसोबत जॅकी भगनानीही दिसतो आहे. फोटोला कॅप्शन देताना टायगरने जॅकीला ‘बॉसमॅन’ म्हणले आहे. टायगर आणि जॅकीची मैत्री जुनीच आहे. टायगर ६ नोव्हेंबरपासून युकेमध्ये ‘गणपत’चे शुटिंग करण्यात गुंतला आहे. या सिनेमात टायगर कृती सेननसोबत दिसणार आहे. २०१४ मध्ये आलेल्या ‘हीरोपंती’ सिनेमातून या जोडीने आपला बॉलीवुड डेब्यु केला होता.


Bundelikhabar

Related posts

खासदार संजय राऊत यांनी केले पत्रकार संघाच्या उपक्रमांचे कौतुक

Bundeli Khabar

टिटवाळा येथे सात वर्षीय चिमुकलीवर सावत्र बापाचा बलात्कार*

Bundeli Khabar

महावितरणच्या भांडूप परिमंडलातील ग्राहकांनी थकवले ४८० कोटी एक लाखहून अधिक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

Bundeli Khabar
error: Content is protected !!