मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : शिवसेना आमदार अजय चौधरी यांच्या उपस्थितीमध्ये अभुदय नगर मधील पाणी बील व अभ्युदयनगर मधील दवाखाना पुनर्बांधणी संदर्भात मुख्य अधिकारी म्हाडा मुंबई बोर्ड यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. बैठकीत अभ्युदय नगर वसाहतीतील पाणी बिलातील १३ कोटी रक्कम कमी करून रहिवाशांच्या मासिक सेवा शुल्कात सूट देण्यासंदर्भात सूचना करण्यात आली. तसेच अभ्युदय नगरमध्ये दवाखाना बनवण्याचे आदेश देण्यात आले. सदर बैठकीला स्थानिक नगरसेवक तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका स्थापत्य समिती अध्यक्ष दत्ता पोगडे, शाखा क्रमांक २०५चे शाखा प्रमुख जयसिंग भोसले तसेच म्हाडा आणि महापालिका अधिकारी उपस्थित होते।

Home » आमदार चौधरींची म्हाडामध्ये बैठक
next post
Related posts
- Comments
- Facebook comments