35.4 C
Madhya Pradesh
May 19, 2024
Bundeli Khabar
Home » नियमन-आधारित गुंतवणूक माध्यमांच्या माध्यमातून मिलेनियल्सना भांडवल बाजारपेठांचा परिचय
महाराष्ट्र

नियमन-आधारित गुंतवणूक माध्यमांच्या माध्यमातून मिलेनियल्सना भांडवल बाजारपेठांचा परिचय

संतोष साहू/महाराष्ट्र,

मुम्बई। मागील काही वर्षांमध्ये भारतीय भांडवल बाजारपेठेत फिजिकलवरून डिजिटलमध्ये झपाट्याने बदल दिसण्यात आला आहे. सुलभपणे प्रगत ब्रोकरेज सेवा देणारी विविध डिजिटल व्यासपीठे उदयास आली आहेत. काही वारसायुक्त ब्रॅण्ड्स डिजिटल-फर्स्ट कंपन्यांमध्ये रुपांतरित झाले आहेत, ज्यांनी भौतिक ते डिजिटल परिवर्तनाचा देखील अवलंब केला आहे. शेअर बाजारामधून उत्तम परतावे मिळत होते आणि डिजिटायझेशनने गुंतवणूकदारांमध्ये भांडवल बाजारपेठेत गुंतवणूक करण्याबाबत विश्वास देखील निर्माण केला होता, ज्यामुळे बाजारपेठेमध्ये रिटेल गुंतवणूकदारांमध्ये वाढ होताना दिसण्यात आली आहे. सुलभपणे गुंतवणूक करण्याच्या पद्धतीने द्वितीय व तृतीय श्रेणीच्या, तसेच त्यापलीकडील श्रेणीच्या शहरांमधील जनरेशन झेड व मिलेनियल्सचे लक्ष वेधून घेतले असल्याचे एंजेल वन लिमिटेडचे चीफ ग्रोथ ऑफिसर प्रभाकर तिवारी सांगतात.

गुंतवणूकीचा विकसित उद्देश: कॉर्पोरेट क्षेत्रात तंत्रज्ञानाचा व्यापक प्रमाणात वापर आणि इतर अनेक पैलूंमुळे तंत्रज्ञान-प्रेमी नवीन पिढ्यांच्या कौशल्यांसाठी मागणी अनेक पटीने वाढली आहे. आज पारंपारिक मालमत्ता वर्ग कमी दरात परतावा देतात. म्हणूनच गुंतवणूकदार इतर विविध माध्यमांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करतात, जे उच्च जोखीम पत्करली असताना देखील उच्च परतावा देऊ शकतात.

तरूण गुंतवणूकदारांसाठी ऑफरिंग्ज: डेटा हे नवीन स्रोत बनले आहे. हीच बाब गुंतवणूकींच्या बाबतीत देखील खरी ठरली आहे. नियमन- आधारित गुंतवणूकीला ‘स्मार्ट बीटा’ देखील म्हणतात. हे उत्पादन अल्गोरिदम्सचा वापर करते आणि डेटाचे विश्लेषण करून व्यापा-यांसाठी योग्य संधींचा शोध घेते. हे झपाट्याने प्राधान्य उत्पादन ठरले आहे. नियमन-आधारित गुंतवणूक साधने व्यापार प्रक्रियेमधून व्यापा-यांचे पूर्वग्रह व मानवी भावनांना दूर करते, जी सक्रियपणे व्यवस्थापित फंड्सची मुख्य थीम होती. गुंतवणूक करण्याची ही पद्धत मुलभूत व तंत्रज्ञान विश्लेषणाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याच्या जुन्या पद्धतींपेक्षा अधिक विश्वसनीय ठरत आहे. नियमन-आधारित धोरणे गुंतवणूकीला अधिक प्रक्रिया-केंद्रित करण्यासाठी मानवी भावना व पूर्वग्रहाला दूर करत विश्वसनीयता आणतात.

काळानुरूप चाचणी केलेल्या धोरणांसाठी मागणी व संभाव्यतेमुळे नियमन-आधारित गुंतवणूक संकल्पनेला चालना दिली आहे. मालमत्ता कामगिरी व ट्रेण्ड्सच्या जुन्या डेटावरील बॅक-टेस्टिंग अल्गोरिदम्स अनिश्चित भांडवल बाजारपेठांमध्ये सर्वोत्तम गुंतवणूक धोरण शोधण्यामध्ये मदत करतात, जे २०१६ मध्ये आणि त्यानंतर नुकतेच महामारीदरम्यान दिसण्यात आले. ब्रोकरेज पद्धतीने गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणूक धोरणांचा शोध घेण्यासाठी सानुकूल संसाधनांची सुविधा देखील दिली आहे. ही डिजिटल-फर्स्ट व्यासपीठे आहेत, ज्यामध्ये हौशी गुंतवणूकदारांना सर्वोत्तम ट्रेडिंग अनुभव देण्यासाठी किमान ब्रोकरेज शुल्क, तसेच पूर्व-परिभाषित धोरणात्मक निर्देशक व ट्रेडिंग बॉट्स यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.

नवोन्मेष्कारी आर्थिक उपाययोजना याच भविष्य आहेत: भांडवल बाजारपेठा वैविध्यपूर्ण होण्यासोबत अधिकाधिक गुंतवणूका होत असताना गुंतवणूक परिसंस्थेचे केंद्रीयकरण करण्याची व्यापक गरज आहे. पैसा उपलब्ध करून देण्यासोबत पैशाचा व्यवस्थापनामधील सहभाग देखील आर्थिकदृष्ट्या साक्षर समाज निर्माण करण्यास मदत करेल. हुशार गुंतवणूकदार नेहमीच आर्थिक व्यवहार सुलभ व कमी जटिल करणा-या नवीन तंत्रज्ञानांचा अवलंब करेल.
सर्वोत्तम माध्यमांच्या समावेशनाने अद्भुत प्रगती केली आहे, पण ते पूर्ण क्षमतेच्या जवळपासही नाहीत. चपळ सानुकूल धोरणे गुंतवणूकदारांना बाजारपेठेच्या प्रतिकूल स्थितीमध्ये देखील जोखीम-व्यवस्थापन प्रबळ यंत्रणांच्या माध्यमातून खात्री घेतलेल्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओसह बाजारपेठेमध्ये अग्रस्थानी राहण्यास सक्षम करतात.

अंतिम विचार: तंत्रज्ञान युजरला परिवर्तन आत्मसात करण्याप्रती स्मार्ट आणि प्रतिसादात्मक करत त्यांच्या व्यवहारामध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणत आहे. काळासह चाचणी करण्यात आलेल्या व प्रमाणित गुंतवणूकीसाठी स्मार्ट बीटा उत्पादनांमध्ये गुंतवणूक करण्याची हीच उत्तम वेळ आहे. गुंतवणूक उत्पादनामधील अडथळे दूर झाल्याने त्वरित समाधान मिळते, तसेच सिम्युलेटेड इंटरफेससह सुलभ अनुभव मिळतो. आजची अर्थव्यवस्था स्वस्त सेवांपेक्षा दर्जा व संशोधनावर अधिक प्रमाणात प्राधान्य देत आहे. लोक त्यांचे कष्ट व सेवांच्या मूल्यासाठी हप्ते भरण्यास तयार आहेत.

Related posts

गोदाम से चोरी किया 12 लाख का परफ्यूम व मेहदी सामग्री को किया बरामद ।

Bundeli Khabar

शिवसेना-वंचित बहुजन आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असणार

Bundeli Khabar

समाज के विशिष्ट लोग नेल्सन मंडेला नोबल पीस अवार्ड एकेडमी द्वारा डॉक्टरेट की उपाधि से सम्मानित

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!