29.1 C
Madhya Pradesh
July 26, 2026
Bundeli Khabar
IMG 20211130 WA0017
महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने शुभम आवारी यांचा ! सन्मान

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील धामणगाव आवारी गावचे भुमीपुत्र शुभम युवराज आवारी यांची भारतीय सैन्य दलामध्ये लेफ्टनंट इंडीयन आर्मी वर्ग एक अधिकारी पदी भारत सरकार येथे निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा शाल पुष्पगुच्छ सन्मानपत्र व देऊन त्यांच्या निवासस्थानी विशेष सत्कार करण्यात आला होता तर यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे तालुकाध्यक्ष अशोक उगले समवेत त्याचे वडील डॉक्टर युवराज आवारी मातोश्री सौ आवारी आजोबा लहू तिकोने आदि उपस्थित होते तर युवराज आवारी यांची भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट (वर्ग १ ) अधिकारी पदी नियुक्त होत त्याची अकोले तालुक्याची मान हिंजवडी आहे. शुभम याचे वडील हे तालुक्यातील सहकार क्षेत्रातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांची कामधेनू असलेल्या अमृता करतो सुनंदाची पशुसंवर्धन अधिकारी या पदावर काम करत असताना जिद्द व चिकाटीच्या जोरावर शुभमने मात्र आपल्या गावचे व घराण्याचे नाव देशपातळीवर तसं कधी आहे त्याचा आदर्श इतर विद्यार्थ्यांनी घेतला तर नक्कीच जिद्द व चिकाटीच्या जोरावर आपण यशस्वी वाटचाल करू शकतो आपल्या आईवडिलांची असलेले स्वप्न त्याने अखेर पूर्ण केले शुभम आवारी
यांने ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई येथे नियुक्तीपूर्व प्रशिक्षण पूर्ण केले. मद्रास युनिव्हर्सिटी तर्फे पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन डिफेन्स अँड स्ट्रटिजिक स्टडीज ही पदव्युत्त्तर पदवी प्राप्त केली.
त्याचे प्राथमिक शिक्षण जि प्र प्राथमिक शाळा ब्राह्मणवाडा व . माध्यमिक शिक्षण सह्याद्री विद्यालय ब्राम्हणवाडा . जवाहर नवोदय विद्यालय अहमदनगर, बारावी चे शिक्षण महाराष्ट्र शासन संचलित सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था औरंगाबाद येथे पूर्ण केले.
पदवीचे शिक्षण SP कॉलेज पुणे येथे पूर्ण केले.तर
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) घेतलेल्या CDSE
कम्बाईन डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन मध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर संरक्षण मंत्रालयातर्फे घेण्यात आलेल्या भारतातील सर्वात कठीण मुलाखत SSB सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड या पाच दिवसीय मुलाखतीमध्ये पात्र होऊन गुणवत्ता यादीत देशात ४६ वा क्रमांक संपादन केला. तर संपूर्ण देशभरातुन एकूण १७४ जणांची निवड झाली.
ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई येथील एक वर्षीय प्रशिक्षणानंतर युद्धनीती, नेतृत्वगुण, शारीरिक व मानसिक कणखरता , लष्करी कायदा , प्रशासन या सारख्या गोष्टींमध्ये पारंगत होऊन भारतीय सैन्याच्या Infantry मध्ये रुजू झाला आहे. याबद्दल त्याचा नुकताच अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे . सहकार महर्षी सिताराम पाटील गायकर यांच्या शुभहस्ते धामणगाव आवारी येथे गौरव समितीच्या वतीने गाव आणि त्याचा यथोचित सन्मान केला या विधी अगस्ती पतसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब भोर यांनी सांगितले की शुभम आवारी याने आमच्या गावचे नाव देशाच्या संरक्षण विभागांमध्ये चमकवले त्याबद्दल नक्कीच संपूर्ण गावात नव्हेतर संपूर्ण तालुक्याला त्याचा अभिमान वाटावा असे कार्य नक्कीच तो करू शकेल इतर विद्यार्थ्यांनी देखील शुभमचा आदर्श घेऊन आपल्याला ज्या क्षेत्रात करिअर घडवायचे आहे त्याठिकाणी आपल्या आई वडिलांनी देखील मुला मुलींच्या आवडी नुसार त्या क्षेत्रामध्ये त्याला संधी द्यावी नक्कीच तो आपले स्वप्न पूर्ण करेल असा आशावाद भोर यांनी यावेळी व्यक्त केला तर अनेक ठिकाणी आई-वडील आपल्या मर्जीनुसार आपल्या मुला-मुलींवर निर्बंध लागतात त्यांच्या आवडीनुसार ते न घेता स्वतःच्या आवडीनुसार त्यांच्यावरचे दबावतंत्र वापरतात त्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या कला गुणांवर परिणाम होतो त्यामुळे शुभम आवडीचा आदर्श इतर पालकांनी घेऊन त्यांना त्यांच्या करिअर मध्येच निवड करावी असे आवाहन देखील भोर यांनी यावेळी व्यक्त केले तर धामणगावला येते त्याचा झालेला सन्मान हा नक्कीच त्याच्या कार्याला सलाम असेल असे देखील ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले


Bundelikhabar

Related posts

महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार निवड समितीची पुनर्रचना

Bundeli Khabar

द्वारिकामाई चैरिटी संस्था ने बहनों की रक्षा का लिया संकल्प

Bundeli Khabar

पुराने कोविड सेंटर का ऑडिट कराया जाए: मनसे विधायक प्रमोद (राजू )पाटिल

Bundeli Khabar
error: Content is protected !!