30.8 C
Madhya Pradesh
October 17, 2026
Bundeli Khabar
IMG 20211130 WA0016
महाराष्ट्र

अंबरनाथ ग्रामीण मध्ये जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते झाले सक्रिय

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
अंबरनाथ : अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दिलेल्या जनजागरण अभियानाला ठाणे ग्रामीण मध्ये चांगला प्रतिसाद मिळत असून आज ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी अंबरनाथ ग्रामीणचा दौरा करून वांगणी येथे ग्रामबैठक घेऊन मोदी सरकारने लादलेली महागाई आणि आणि इंधनवाढ यावर कडाडून टीका केली तसेच आता काँग्रेसला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सदस्य नोंदणी करून सक्रिय होण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले.

ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष यांनी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण केल्याने सदर ग्रामबैठक मध्ये उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी तनमनधनाने काँग्रेस पक्ष वाढविण्याचे आश्वासन दिले यावेळी आपल्या जीवाची बाजी लावून रेल्वे रूळावर पडलेल्या लहान बालकाचे प्राण वाचविणाऱ्या मयूर शेळकेचा सत्कार करण्यात आला.

या ग्रामबैठकीस बदलापूर ब्लॉक अध्यक्ष संजय जाधव,महिला जिल्हा अध्यक्षा संघजा मेश्राम,माजी तालुका अध्यक्ष प्रमोद शेलार,जिल्हा उपाध्यक्ष यासीर बुबेरे व ग्रामीण भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Bundelikhabar

Related posts

फ प्रभागातील गोविंद निवास या अतिधोकादायक इमारतीच्या निष्कासनाची धडक कारवाई

Bundeli Khabar

द्वारकामाई चैरिटी संस्था के दिंडोशी सचिव नियुक्त हुए अनिल राजपुत

Bundeli Khabar

रेल्वे हमाल माथाडी कामगारांच्या समर्थनार्थ वंचित बहुजन माथाडी’चे बेमुदत धरणे आंदोलन

Bundeli Khabar
error: Content is protected !!