38.9 C
Madhya Pradesh
May 17, 2024
Bundeli Khabar
Home » वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे घवघवीत यश
महाराष्ट्र

वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे घवघवीत यश

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मुंबई विद्यापीठाच्या अॅप्लाईड आर्ट या शाखेत वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या अभियांत्रिकी व व्हिज्युअल आर्ट (बीएफए) महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे. बीएफए अॅप्लाईड आर्ट शाखेतून या कॉलेजची आकांक्षा अनिल जाधव हिने पहिला तर श्रेयस रमाकांत पाटील याने दुसरा क्रमांक पटकावला आहे. बीएफएच्या पेंटिंग शाखेत वैष्णवी हंसराज सावंत हिने द्वितीय तर ईशा मिलिंद कांबळी, अथर्व विवेक कंरदीकर यांनी अनुक्रमे तिसरा व चौथा क्रमांक प्राप्त केला आहे. जे. जे. कला महाविद्यालयाच्या पाठोपाठ वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अभियांत्रिकी व व्हिज्युअल आर्ट कॉलेज लौकिकप्राप्त करणारे महाविद्यालय ठरले आहे.

विद्यार्थ्यांच्या या कामगिरीबद्दल संस्थेचे सचिव अॅड. आप्पासाहेब देसाई आणि चेअरमन नंदकुमार काटकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी नियमित अभ्यासक्रमाबरोबरच चर्चासत्र तसेच अन्य उपक्रमांचेही आयोजन करण्यात येते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या फाईन आर्ट विभागप्रमुख भूषविलेल्या डॉ. मुक्तादेवी प्रशांत मोहिते यांचेही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळत असते.

बीएफए म्हणजेच अॅप्लाईड आर्टची महाराष्ट्रात एकूण सात महाविद्यालये आहेत. त्यापैकी मुंबईच्या मध्यवर्ती भागात शीव येथील वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अभियांत्रिकी व व्हिज्युअल आर्ट (बी. एफ. ए.) महाविद्यालय हे २०२० सालापासून सुरु आहे. अल्पावधीत या महाविद्यालयाने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. त्यामुळे शासकीय जे. जे. कला महाविद्यालयानंतर खासगी संस्थेच्या माध्यमातून कार्यरत असलेले हे पहिलेच अशाप्रकारची उत्कृष्ट कामगिरी करणारे महाविद्यालय ठरले आहे.

Related posts

अखिल झावबावाडी साई सेवा मंडळातर्फे माननीय श्री. प्रविणजी अग्रवाल यांचा सत्कार

Bundeli Khabar

ऊषा मंगेशकर और जयकांत भाई हिरानी “राष्ट्रीय अभिमान पुरस्कार-2023” से सम्मानित

Bundeli Khabar

कार्यभार दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी स्वीकारला

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!