21.6 C
Madhya Pradesh
October 6, 2024
Bundeli Khabar
Home » चित्रकला स्पर्धा च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळणार
महाराष्ट्र

चित्रकला स्पर्धा च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळणार

किशोर पाटील/महाराष्ट्र
मुबाई : ऑनलाइन चित्रकला स्पर्धा च्या उद्घाटन प्रसंगी आमदार राजू मामा भोळे आणि आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांचे प्रतिपादन
.
जळगाव – चित्रकला स्पर्धा च्या माध्यमातून विद्यार्धी यांच्या कलागुणांना मोठी वाव मिळेल. त्यामुळे या स्पर्धेतून चांगले चित्रकार समोर यावे. त्यांच्यासाठी ही स्पर्धा एक चांगले व्यासपीठ आहे, असे प्रतिपादन आमदार राजू मामा भोळे यांनी केले.
एक्सेलंट ड्रॉइंग फाउंडेशन व श्री राजपूत करणी सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय ऑनलाइन चित्रकला स्पर्धा च्या शुभारंभ प्रसंगी आमदार राजू मामा भोळे बोलत होते. हा ऑनलाइन सोहळा प्रभात चौकातील महाराणा प्रतापसिंह महाराज यांच्या पुतळ्याजवळ झाला. या स्पर्धेची माहिती एक्से लंट ड्रॉइंग फाउंडेशन चे संचालक सतीश चौधरी यांनी दिली. या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक
आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन चे संचालक जितेंद्र पाटील, श्री राजपूत करणी सेनेचे विभागीय अध्यक्ष प्रवीण पाटील, जिल्हाध्यक्ष विठ्ठल सिंग मोरे, जिल्हा उपाध्यक्ष आशिष सिंग हाडा, मंडळ अधिकारी योगेश्वर नानवरे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण सपकाळे यांनी केले.
सूत्रसंचालन श्री राजपूत करणी सेनेचे खानदेश विभागीय कार्याध्यक्ष विलास सिंग पाटील यांनी केले. या वेळी शेतकरी संघटनेचे चोपडा तालुकाध्यक्ष भरत देशमुख, नाजनिन शेख आदी उपस्थित होते.

Related posts

शिक्षा के क्षेत्र में मची लूट को मिटाने के लिए आगे आये सरकार : सुरेश प्रजापति

Bundeli Khabar

ठाणे मनपा परिवहन ने अपनी तिजोरी में १३ लाख रुपए

Bundeli Khabar

माविम’ च्या अध्यक्षा ज्योतीताई ठाकरे यांची फेरनियुक्ती

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!