22.4 C
Madhya Pradesh
August 31, 2026
Bundeli Khabar
IMG 20211125 WA0008
महाराष्ट्र

सर्वांना सोबत घेऊन गावाचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहीन – बंडू पाटील

Bundelikhabar

पिंपळनेर ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंच पदी बंडू पाटील यांची बिनविरोध निवड!

किशोर पाटील/महाराष्ट्र
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील पिंपळनेर ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौ.इंदिरा प्रकाश गायकवाड यांनी काही कारणास्तव महिनाभर ग्रामपंचायत कार्यालयात हजर राहता येणार नाही असे ग्राम विकास अधिकारी श्री.किशोर गोडसे यांना लेखी पत्र दिल्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत ग्रामपंचायतीचा कारभार विद्यमान उपसरपंच श्री बंडू बबन पाटील यांच्याकडे सोपवावा म्हणून ग्राम विकास अधिकारी श्री.किशोर गोडसे यांनी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी डॉ.श्री.प्रदीप घोरपडे यांना सांगितले त्यामुळे त्यांच्या आदेशान्वये श्री बंडू बबन पाटील यांची नवनिर्वाचित प्रभारी सरपंचपदी बुधवार दि. २४/११/२०२१ रोजी लेखी पत्र देऊन सर्व सदस्यांच्या उपस्थितीत प्रभारी सरपंच म्हणून नियुक्ती करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री.नंदू एकनाथ पाटील श्री.सागर जयहिंद गायकवाड सौ.सोनाली जीवन गायकवाड सौ.अरुणा सचिन गायकवाड श्री.कपिल नामदेव ऐनकर,सौ.दिव्या कल्पेश ठाकूर, सौ. ताईबाई एकनाथ गोसावी, ग्राम विकास अधिकारी श्री.किशोर कृष्णा गोडसे, उपस्थित होते, तसेच नवनिर्वाचित प्रभारी सरपंच श्री बंडू बबन पाटील यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी श्री. गिरीष विठ्ठल म्हात्रे माजी पंचायत समिती सदस्य, श्री. उद्धव शेठ गायकवाड विशेष कार्यकारी अधिकारी, श्री जय हिंद बळीराम गायकवाड, सौ. सुलभा गणपत गायकवाड तिसगाव, श्री. बबन हेंदर पाटील, श्री. जगन्नाथ हेंदर पाटील, श्री. परशुराम दुंदा गायकवाड आदी मान्यवर व मोठ्या संख्येने महिलावर्ग,ग्रामस्थ वर्ग उपस्थित होते.
सर्वप्रथम मी सर्व सन्माननीय सदस्य व ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार मानतो कारण त्यांच्यामुळेच आज माझी प्रभारी सरपंच म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे, मला जो काही कालावधी दिला आहे त्या कालावधीमध्ये गावाच्या विकासासाठी सर्व सदस्यांना एकत्र घेऊन गावाचा विकास कशा प्रकारे करता येईल यासाठी मी प्रयत्न करेन व सर्व ग्रामस्थांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास पात्र ठरवण्यासाठी प्रयत्नशील राहीन,त्यांच्या विश्वासाला कोणत्याही प्रकारे तडा जाऊ देणार नाही असे यावेळी नवनिर्वाचित प्रभारी सरपंच श्री बंडू( प्रशांत) बबन पाटील यांनी
सांगितले.


Bundelikhabar

Related posts

कोरोना महामारी में मृतकों की आत्मा की शांति के लिए राजकमल सोसायटी में गायत्री महायज्ञ अनुष्ठान

Bundeli Khabar

स्वातंत्र्यदिनी जगाला दिसणार तिरंग्याची मोहिनी

Bundeli Khabar

केंद्रीय मंत्री नारायण राणे को उद्धव ठाकरे शिवसेना पर बयान देना पडा भारी

Bundeli Khabar
error: Content is protected !!