30 C
Madhya Pradesh
October 16, 2026
Bundeli Khabar
IMG 20211125 WA0007
महाराष्ट्र

कोरोना काळात पडद्यामागून आपण सरकारला मोलाची साथ दिल्याबद्दल आपले मनापासून आभार – महेश चौघुले

Bundelikhabar

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व भारतीय खाद्य निगम यांच्या सुवर्णमहोत्सवी दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न!

किशोर पाटील/महाराष्ट्र
भिवंडी : भारत सरकारच्या निर्देशानुसार
भारतीय खाद्य निगम महामंडळ अंजुर फाटा भिवंडी येथे नुकताच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व भारतीय खाद्य निगम महामंडळ यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षा दिनानिमित्त भिवंडी युनिट अंजुर फाटा येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भिवंडी पश्चिमचे आमदार श्री महेश चौघुले, भिवंडी महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक श्री निलेश चौधरी, भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष तथा राहणाल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री राजेंद्र भोईर ,मुख्य शाखा प्रबंधक श्रीमती बीना एक्का , आदी मान्यवर व मोठ्या संख्येने कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
यावेळी देशभक्तीपर गीत गायन, नृत्य स्पर्धा, वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या, व भारत सरकारच्या निर्देशानुसार भारतीय खाद्य निगम महामंडळ अंजुर फाटा भिवंडी येथे कार्यक्रम संपन्न झाला.
केंद्रात जेव्हापासून भारतीय जनता पक्षाचे सरकार आले आहे तेव्हापासून विविध बदल घडले आहेत त्यामध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे डिजिटल इंडिया यामुळे केंद्र सरकार व राज्य सरकारची सर्व कामे डिजिटल माध्यमातून होत आहेत या माध्यमांमध्ये कोणत्याही कामात भ्रष्टाचार होत नाही हे सिद्ध झाल आहे. यापुढेही देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र जी मोदी हे अनेक नवीन उपक्रम राबविणार आहेत विविध प्रकारच्या नवनवीन योजना सध्या केंद्र सरकारच्या वतीने संपूर्ण देशात कार्यान्वित झाल्या आहेत त्यामुळे सामान्य जनतेला त्याचा फायदा होत आहे, देशावर आलेला कोरोनाचा महाभयंकर संकट
आता दुर झाला आहे, अशा कठीण परिस्थितीत भारतीय खाद्य निगम महामंडळाने पडद्यामागून केंद्र व राज्य सरकारला मोलाचे सहकार्य केले त्यामुळे मी आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो यापुढेही असेच सहकार्य भारतीय खाद्य निगम महामंडळ केंद्र व राज्य सरकारला करेल करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो व आपणा सर्वांना सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या शुभेच्छा देतो असे यावेळी भिवंडी पश्चिम चे आमदार श्री.महेश चौघुले यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन भारतीय खाद्य निगम महामंडल भिवंडी शाखेचे शाखा प्रबंधक श्री जे. जी .शर्मा व कर्मचारी वर्गाने केले होते त्यामुळे या सर्वांचे कौतुक मुख्य शाखा प्रबंधक श्रीमती बिना एक्का यांनी केले.


Bundelikhabar

Related posts

न बैंड बाजा न शहनाई बगैर दहेज की अनोखी शादी

Bundeli Khabar

मनोहर धोत्रे यांच्या चरित्रात्मक आणि लीला जंजिरे यांच्या स्त्री कथांच्या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा संप

Bundeli Khabar

शीतल महेंद्र गायकवाड यांच्या प्रयत्नाने प्रभाग क्रमांक 12 जेत्वन नगर येथे मोफत लसीकरण केंद्र संपन्न

Bundeli Khabar
error: Content is protected !!