30.7 C
Madhya Pradesh
October 16, 2026
Bundeli Khabar
IMG 20220619 WA0021
महाराष्ट्र

24 तासाच्या आत 1,27,450/- रु. किं. चे सोन्याचे दागिने व 60,000/- रूपये रोख रक्कम सकट आरोपीला केले अटक.

Bundelikhabar

10 / 100 SEO Score

राकेश चौबे
टिटवाळा : टिटवाळा पुर्व येथे राहणाऱ्या सौ. शिवानी शिवम सिंग वय 22 वर्ष यांच्या घरातून अज्ञात व्यक्तीने दि.17/०६/२० रोजी 1,27,450 /- रू किंमतीचे सोन्याचे दागिने व 60,000/- रूपये रोख रक्कम घेऊन पोबारा झाल्याची माहिती टिटवाळा तालुका पोलिसांना दिली, दिलेल्या माहितनुसार पोलिसांनी गुन्हा रजि.नं 292/2022 भा.दं.वि.सं कलम 380,454,457 प्रमाणे अज्ञात आरोपी इसमाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपशील सुरू केली व आपल्या गुप्तचरयंत्रणांच्या माध्यमातून आरोपीची सखोळ माहिती ऐकत्र करून अवघ्या 24 तासाच्या आत आरोपी महेश उर्फ भुऱ्या रघुनाथ खरपडे रा. कुंभारशिव, ता. भिवंडी यास अटक करुन त्यांचेकडून गुन्ह्यातील गेला माल 1,27,450/- रु. किं. चे सोन्याचे दागिने हस्तगत करून त्याला जेरबंद करण्यात यश मिळवले.

सदरची उल्लेखनीय कामगिरी कल्याण तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजु वंजारी यांचे मार्गदर्शनाने डिबी पथक एपीआय. शिंगटे, पोना. दर्शन सावळे, पोना. नितीन विशे, पोको. योगेश वाघेरे यांनी केले.


Bundelikhabar

Related posts

आईजी इंटरनेशनल ने पीडब्ल्यूसी की सहायता से ईएसजी कार्यक्रम पर दिया ज़ोर

Bundeli Khabar

ठाण्यात होणार “नारी तू नारायणी रत्न पुरस्कार आणि सौंदर्य स्पर्धा”

Bundeli Khabar

ठाणे महापालिका आयुक्तांनी केली रेल्वे पास मदत कक्षाची पाहणी : मनुष्यबळ वाढविण्याचे दिले निर्देश

Bundeli Khabar
error: Content is protected !!