24.9 C
Madhya Pradesh
September 13, 2026
Bundeli Khabar
IMG 20211124 WA0007
महाराष्ट्र

पंढरपूरातील प्रस्तावित धर्मशाळेसाठी वीस लाखाची देणगी

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील पिसे चिराडपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच रिंकल पाटील आणि माजी सरपंच विजय पाटील यांनी पंढरपूर येथे होणाऱ्या प्रस्तावित धर्मशाळेच्या जागेसाठी सुमारे वीस लाख रुपयांची देणगी दिली आहे. भिवंडी तालुक्यात मोठ्या संख्येने वारकरी संप्रदाय असून येथील वारकरी दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला तसेच इतरही वेळी मोठया संख्येने पंढरपूर येथे दर्शनासाठी जात असतात.तिथे गेल्यावर गर्दीच्या वेळी त्यांची राहण्याची गैरसोय होत असते त्यामुळे त्यांची ही गैरसोय लक्षात घेऊन आमणे लोनाड परिसरातील वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून तिथे पाच गुंठे जागा विकत घेऊन दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने धर्मशाळा बांधण्यात येणार आहे.यामुळे सदर धर्मशाळेच्या जागेसाठी पिसे चिराडपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच रिंकल पाटील आणि माजी सरपंच विजय पाटील या उभयतांनी स्व.निर्मला गोपीनाथ पाटील त्यांच्या स्मरणार्थ वीस लाख रुपयांचे योगदान या धर्मशाळेसाठी दिले आहे.सदर रकमेचा धनादेश त्यांनी परिसरातील वारकरी संप्रदायाकडे दिला.या धर्मशाळेमुळे येथील वारकऱ्यांची पंढरपूर येथे मोठी सोय होणार आहे.


Bundelikhabar

Related posts

अनुज डान्सिंग सेन्सेशन मिथुन चक्रवर्ती मध्ये बदलला

Bundeli Khabar

राज्यस्तरीय गझल लेखन महास्पर्धेच्या चौथ्या पर्वाला जानेवारीपासून प्रारंभ

Bundeli Khabar

सावळाराम क्रीडा संकुल समोर वृक्ष वाटिकांचा बस्तान , प्रभाग क्षेत्र अधिकारांचा आर्थिक आशीर्वाद

Bundeli Khabar
error: Content is protected !!