21.1 C
Madhya Pradesh
October 18, 2026
Bundeli Khabar
IMG 20210909 WA0018
महाराष्ट्र

गणपती सणानिमित्त चाकरमानीसाठी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या तर्फे मोफत एसटी बस सेवा

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
मुंबई : कोकणात मोठ्या थाटामाटात गणपती बाप्पाचं आगमन केलं जातं. गणपती बाप्पाची मज्जा खरी कोकणातच.. आणि त्यासाठी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली या भागातील मोठा चाकरमानी वर्ग हा न चुकता गणपतीसाठी कोकणात जात असतो. मात्र कोरोनामुळे अनेक जण बेरोजगार झाले आहेत.त्याच बरोबर अर्धा पगारी चाकरी करत आहे.अशा नागरिकांसाठी मदतीचा हात म्हणून गणपती सणानिमित्त चाकरमानीसाठी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या तर्फे मोफत एसटी बस सेवा सुरू करण्यात आले।


शिवसेना मा.कल्याण तालुका प्रमुख एकनाथबाबा पाटील यांच्या प्रयत्नाने समस्त कोकणात एसटी महामंडळाची ” डोंबिवलीतील भोपर देसलेपाडा विभागातील नागरिकांसाठी आठ मोफत एसटी बस सेवा मोफत सुरू केले असून कोकणातील कणकवली ,रत्नागिरी, राजापूर, चिपळूण, खेड, मंडणगड, दापोली,महाड या भागातील कोकणवासीयांना मोफत बस भोपर येथून सोडण्यात आले. सदर प्रवास करणाऱ्या गणेश भक्तांना प्रवासासाठी जेवण व पाणी बॉटल तसेच मास्क वाटप, सॅनिटायझर चे वितरण शिवसेना शाखा भोपर देसलेपाडा च्या वतीने करण्यात आले।


प्रथम लालपरिचे पूजन करून पुष्पमालीका तालुका प्रमुख एकनाथबाबा पाटील यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवण्यात आला उदघाटन प्रसंगी गाडीला हिरवा झेंडा दिला, पहिल्यादिवशी गाडय़ा रवाना झाल्या.यावेळी प्रवाशांनी ‘गणपती बाप्पा मोरया ‘चा जयघोष करीत प्रवासाला सुरुवात केली सदर प्रसंगी भोपर विभाग प्रमुख दिलखूष दादा माळी, उपविभागप्रमुख रमेश पाटील, नितीन माळी, उपशाखा प्रमुख रोशन पाटील,राणा पाटील,पंकज माळी तसेच मितेश नवले यांनी प्रवाशांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या।


Bundelikhabar

Related posts

मोहन ग्रुप द्वारा हो रही मनमानी के खिलाफ अनशन की चेतावनी

Bundeli Khabar

डॉ. अनिल आव्हाड यांची आय. एम. ए. मुंबईच्या अध्यक्षपदी निवड

Bundeli Khabar

मुरबाड तालुक्यातील तारांगण मतिमंद मुलांच्या निवासी कार्यशाळेला प्रियंका चोरघे यांनी दिली सदिच्छा भेट

Bundeli Khabar
error: Content is protected !!