34.4 C
Madhya Pradesh
May 18, 2024
Bundeli Khabar
Home » संकल्पचा बाल मेळावा मोठ्या उत्साहात
महाराष्ट्र

संकल्पचा बाल मेळावा मोठ्या उत्साहात

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : जागतिक बालदिन आणि जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून संकल्प संस्थेचे अध्यक्ष विनोद हिवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कार्यक्रमाचे समन्वयक सनोज वाल्मीकी आणि कार्यक्रमाचे सह समन्वयक नसीम खान यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार दिनांक १९ नोव्हेंबर रोजी पद्मानगर रोड नंबर १४, बैगनवाडी, शिवाजी नगर, गोवंडी, मुंबई येथे मोठ्या उत्साहात बाल मेळावा साजरा करण्यात आला.

शिवाजी नगर गोवंडी या विभागातील सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या हा मागासवर्गीय तसेच असंघटित आणि कचरा वेचक, नाका कामगार, कष्टकरी कामगार, काम करणाऱ्या कुटुंबातील गरीब होतकरू मुलांचे सर्वांगीण विकास आणि सुप्त गुणांना वाव देण्यासाठी व शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकून राहण्यासाठी तसेच अभ्यासाची आवड निर्माण होण्यासाठी संकल्प अभ्यास वर्गातील ७० मुलांसाठी बालदिन साजरा करण्यात आला.

कोरोना काळात या मुलांचे बालपण हरवून गेले होते, पण या बालदिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुलांनी हा दिवसभराचा कार्यक्रम जल्लोषात सहभागी होऊन अनुभवला, आणि अक्षरशः आयोजकांचे मनही हेलावून गेला. संकल्प अभ्यास वर्गातील मुले खूप उत्साहात कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन कार्यक्रमाचा आनंद घेत होते. आम्ही सुद्धा आमच्या बालपणाची आठवण करून मुलानं बरोबर मज्जा करीत होतो. अंधार्‍या वस्तीत एक दिवा आम्ही लावू शकलो हा सार्थ अभिमान एक नवी उमेद देऊन गेला, असे विनोद हिवाळे यांनी सांगितले.

मुलांचे मनोरंजन व्हावे ह्यासाठी मैदानी स्पर्धा, शारीरिक चपळाई (व्यायाम) होण्यासाठी विविध खेळ घेण्यात आले, तसेच खेळण्यासाठी मोकळीकता मिळावी शिवाय त्यांच्या सुप्त गुणांना वाव तसेच बौद्धिक चालना मिळावी या करिता अभ्यासिका वर्गातील मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये मुलांसाठी चित्रकला, हस्तकला, नृत्य, नाटक इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे नियोजन संकल्प संस्थेच्या शिक्षिका अंजुम खान, शबनम कुरेशी, कैसरजहाँ शहा मरियम शेख यांनी केले. तसेच युवा संस्थेच्या कार्यकर्त्या अनिता चंदनशिवे यांनी मुलाचे अधिकार आणि सामाजिक कार्यकर्ते निशांत साळवी यांनी नशा या विषयावर खेळाच्या माध्यमातून चर्चासत्र खूप छान प्रकारे घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता हेंडवे यांनी केले. मैदानी स्पर्धांचे आयोजन भारती तांबे यांनी केले. वनिता सावंत यांनी सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख म्हणून काम पाहिले. आभार प्रदर्शन नसरीन शेख यांनी केले. कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य आर्यन फाऊंडेशन, लायन्स क्लब जीवनधारा, जमिल कुरेशी, शमशाद तुर्की, डॉ. प्रभा तिरमारे, विनोद पंडित,साजिद खान, मिलन पवार, तेजल नाईक सोपरकर, रवी सिंग, शोभा नायर, पल्लवी सुर्वे, जयश्री (माई) सावर्डेकर, विनोद पटेल, कविता बागुल, मानसी नवले, कालिदास रोटे, वासुदेव पाटील, कविता करंडे, ज्योती गोसावी यांचे लाभले.

Related posts

भिवंडीतील चिंचोटी माणकोली रस्त्याच्या दुरावस्थे विरोधात गाव विकास समितीचा रस्ता रोको आंदोलन,वाहनांच्या चार ते पाच किलोमीटर पर्यंत लागल्या रांगा

Bundeli Khabar

भिवंडी तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदी वृषाली भोईर यांची नियुक्ति

Bundeli Khabar

शेकडो महिलांचे संसार उध्वस्त करणाऱ्या मटका जुगार अड्ड्यावर कारवाई नाही

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!