22.4 C
Madhya Pradesh
August 31, 2026
Bundeli Khabar
IMG 20211121 WA0001
महाराष्ट्र

तीन कृषी कायदे रद्द, काँग्रेसने साजरा केला पेढे वाटून विजय दिवस साजरा

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
शहापूर : काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेत असल्याचे जाहीर केल्यानंतर ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या आदेशाने शहापूर मध्ये सेवादल व ओबीसी काँग्रेस तर्फे काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात पेढे वाटून शेतकरी विजय दिवस साजरा करण्यात आला। तसेच शिवतीर्थ शहापूर येथे समविचारी पक्षाना सोबत घेऊन फटाके फोडून आनंद व्यक्त केला।

याप्रसंगी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महेश धानके,जेष्ठ नेते प्रकाश भांगरथ सर,किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष कॉ आत्माराम विषे,कॉ संभाजी भेरे,बहुजन विकास आघाडीचे तालुका अध्यक्ष योगेश हजारे,प्रहार चे अध्यक्ष वसंत पानसरे,सेक्युलर आरपीआय चे केशव साबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी ओबीसी विभागाचे जिल्हा अध्यक्ष भास्कर जाधव,पर्यावरण विभाग जिल्हा अध्यक्ष रामचंद्र जोशी,सेवादल तालुका अध्यक्ष दशरथ भोईर,आबा देशमुख,दशरथ तारमले,कॉ जयराम चंदे,कॉ.जामदार,लक्ष्मण निचिते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।


Bundelikhabar

Related posts

कोरोना नियमात कोणतीही विशेष कॅटेगरी नाहीये,राजकारणी असो किवा सर्वसामान्य नियम सर्वांना सारखेच-खा. श्रीकांत शिंदे

Bundeli Khabar

भावबंध कोकणचे : मालवणी भावभावनांचो कोलाज

Bundeli Khabar

पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; राष्ट्रपतींकडून विधेयकाला मंजुरी

Bundeli Khabar
error: Content is protected !!