24.6 C
Madhya Pradesh
July 27, 2026
Bundeli Khabar
IMG 20211116 WA0002
मनोरंजन

मुलांच्‍या माध्‍यमातून २० झोपडपट्टी भागांमध्‍ये जात प्‍लास्टिक पुनर्चक्रणला चालना देण्‍याचा मनसुबा

Bundelikhabar

संतोष साहू/महाराष्ट्र,
मुंबई : बोटल्‍स फॉर चेंजने शहरातील झोपडपट्ट्यांमध्‍ये वापरलेल्‍या प्‍लास्टिकचे पुनर्चक्रण आणि प्‍लास्टिक कचरा वेगळे ठेवण्‍याच्‍या महत्त्वाबाबत जागरूकता निर्माण करण्‍यासाठी मोहिम राबवली आहे. कंपनीचा २० हून अधिक झोपडपट्ट्यांमध्‍ये जात तेथे वापरलेल्‍या प्‍लास्टिकची योग्‍यरित्‍या विल्‍हेवाट लावण्‍याच्‍या पद्धतींबाबत माहिती देण्‍यासोबत जागरूकता निर्माण करण्‍याचा मनसुबा आहे. प्रदूषण, वातावरणीय बदल आणि स्थिरतेवरील त्‍यांचा मोठा परिणाम ही चिंतेची बाब आहे आणि विविध स्‍तरांवर या समस्‍येचे निराकरण करण्‍याचे प्रयत्‍न केले जात आहेत. बिस्‍लेरीचा नेहमीच विश्‍वास आहे की, लहान मुलांपासूनच जागरूकतेचा प्रसार करण्‍याला सुरूवात केली पाहिजे. या उपक्रमाच्‍या माध्‍यमातून कंपनीचा तरूण पिढीला वापरलेले प्‍लास्टिक वापरानंतर स्‍वच्‍छ व कोरडे ठेवण्‍याच्‍या महत्त्वाबाबत जागरूक करण्‍याचा मनसुबा आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्‍या २०१९ च्‍या अहवालानुसार (As of 2019 report by the Central Pollution Control Board) भारतामध्‍ये दरवर्षाला ६६०,७८७.८५ टन प्‍लास्टिक कचरा निर्माण होतो, ज्‍यापैकी जवळपास ६० टक्‍के प्‍लास्टिक कच-याचे पुनर्चक्रण केले जाते. जवळपास ४३ टक्‍के पॅकेजिंग साहित्‍य हे सिंगल युज प्‍लास्टिकपासून बनवले जाते. तसेच कचरा व्‍यवस्‍थापन हे शहरी झोपडपट्ट्यांमध्‍ये सामना केले जाणारे सर्वात मोठे पर्यावरणीय आव्‍हान आहे, ज्‍याकडे नागरिक आणि स्‍थानिक अधिका-यांकडून दुर्लक्ष केले जात आहे. या स्थितीचा सामना करण्‍यासाठी बिस्‍लेरीचा उपक्रम बोटल्‍स फॉर चेंज वापरलेल्‍या प्‍लास्टिकचे पुनर्चक्रण आणि प्‍लास्टिक कचरा वेगळा ठेवण्‍याबाबत जागरूकता निर्माण करत शुद्ध, हरित व स्थिर पर्यावरण निर्मितीप्रती निरंतनपणे कार्य करतो.

या उपक्रमाचा भाग म्‍हणून बिस्‍लेरीने मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथील नऊ विभिन्‍न झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांसाठी विशेष जागरूकता सत्रांचे आयोजन केले. या उपक्रमाला ३०० हून अधिक कुटुंबांचा सहभाग दिसण्‍यात आला आणि हा उपक्रम १५० हून अधिक मुलांपर्यंत पोहोचला. या मोहिमेअंतर्गत एकूण २०० किलोग्रॅमहून अधिक कठीण व सौम्‍य प्‍लास्टिक साहित्‍य (जसे रॅपर्स, कंटनेर्स, पॅकिंग साहित्‍य इत्‍यादी) गोळा करण्‍यात आली. मुलांकडून मिळालेल्‍या उत्‍साहपूर्ण प्रतिसादामुळे बोटल फॉर चेंजला हा उपक्रम सुरू ठेवत २० हून अधिक झोपडपट्ट्यांपर्यंत विस्‍तारीत करण्‍यास प्रोत्‍साहन मिळाले. प्‍लास्टिक पुनर्चक्रणीय संसाधन असल्‍यामुळे वापरलेल्‍या प्‍लास्टिकचे व्‍यवस्‍थापन करण्‍यामध्‍ये सामील प्रत्‍येक भागधारकाला एक मूल्‍य मिळेल, जसे जुने वर्तमानपत्र. हे मूल्‍य स्‍थानिक बचत गटांना देता येऊ शकते आणि बदल्‍यात ते झोपडपट्टीतील मुलांच्‍या कल्‍याण उपक्रमांसाठी त्‍याचा वापर करू शकतात. हे संपादित करण्‍यासाठी स्‍वच्‍छ व कोरड्या स्‍वरूपात प्‍लास्टिक कचरा वेगळा ठेवणे अत्‍यंत महत्त्वाचे आहे. चक्रिय अर्थव्‍यवस्‍थेमध्‍ये वापरलेल्‍या प्‍लास्टिकसाठी ही मूल्‍यसाखळी निर्माण करण्‍याचा मोठा उद्देश आहे.

या प्रभावी उपक्रमाबाबत बोलताना बोटल्‍स फॉर चेंजच्‍या कॉर्पोरेट सोशल रिस्‍पॉन्सिबिलिटीच्‍या संचालक श्रीमती अंजना घोष म्‍हणाल्‍या, ”पर्यावरणामध्‍ये सकारात्‍मक बदल घडवून आणण्‍यासाठी आमचा बोटल्‍स फॉर चेंज उपक्रम मागील काही वर्षांपासून अनेक नवोन्‍मेष्‍कारी पद्धतीने प्‍लास्टिकचा वापर व विल्‍हेवाटबाबत जागरूकतेचा प्रसार करण्‍याचा प्रयत्‍न करत आहे. यंदा बालदिनी आम्‍ही मुंबईतील झोपडपट्ट्यांशी संलग्‍न होऊन तेथील मुले, प्रौढ व्‍यक्‍ती आणि समुदायाच्‍या चॅम्पियन्‍समध्‍ये प्‍लास्टिक कचरा वेगळा ठेवण्‍यासोबत प्‍लास्टिकच्‍या पुनर्चक्रणाबाबत जागरूकता निर्माण करण्‍याचे ठरवले. आम्‍हाला भावी पिढ्यांसाठी सकारात्‍मक बदल घडवून आणणा-या आमच्‍या प्रयत्‍नांमध्‍ये दृढ विश्‍वास आहे.”

प्‍लास्टिक पर्यावरणासाठी धोका आहे असे मानले जाते. पण योग्‍यरित्‍या वापर व विल्‍हेवाट लावल्‍यास प्‍लास्टिक स्थिरता ध्‍येये संपादित करण्‍यामध्‍ये मदत करू शकते. या दिशेने महत्त्वाचे पाऊल म्‍हणजे वापरानंतर प्‍लास्टिक स्‍वच्‍छ करणे, वेगळे ठेवणे आणि पुनर्चक्रण करणे. हे लहान, पण लक्षणीय पाऊल खूपच प्रभावी आहे. भारताने प्‍लास्टिक कच-याचे योग्‍यरित्‍या व्‍यवस्‍थापन केले तर देशाला उत्‍पादित करण्‍यात येणा-या प्‍लास्टिकचे १०० टक्‍के पुनर्चक्रण करण्‍याची आणि भावी पिढ्यांसाठी पर्यावरणाचे जतन करण्‍याची संधी आहे.


Bundelikhabar

Related posts

‘लाइगर’ के लिए विजय देवरकोंडा ने 1 साल तक की कड़ी मेहनत

Bundeli Khabar

नंदिता दास के निर्देशन में काम करेंगे कपिल शर्मा और शहाना गोस्वामी

Bundeli Khabar

कंगना रनौत करेंगी एकता कपूर की बेबाक रियलिटी शो ‘लॉक अप : बैडएस जेल, अत्याचारी खेल’ को होस्ट

Bundeli Khabar
error: Content is protected !!