समाजोपयोगी कार्यासाठी सह्याद्री पतसंस्था अग्रेसर- विश्वासजी थळे
सह्याद्री पतसंस्था व इतर संस्थांच्या माध्यमातून लाखीवली येथे वनराई बंधारा श्रमदानातून उभारला !
किशोर पाटील/महाराष्ट्र
भिवंडी : सालाबादप्रमाणे भिवंडी तालुक्यातील लाखिवली येथे सह्याद्री पतसंस्था व इतर अनेक सामाजिक संस्थेमार्फत वनराई बंधारा प्रकल्प बांधण्याचं कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात सर्व सहभागी सह्याद्री पतसंस्थेसोबतच लिओ क्लब, लायन्स क्लब, पंचायत समिती भिवंडी आणि दांडेकर विद्यालय इत्यादी संस्थांच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन बंधारा बांधण्याचे काम पूर्ण करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन लायन्स क्लब च्या अध्यक्षा सौ. शितल सुधीर देशमुख ,श्री सुधीर देशमुख,सचिव डॉ.प्रमोद पाटील ,सौ जयश्री प्रमोद पाटील यांनी केले होते.
हा संपूर्ण बंधारा १०० मीटर लांबीचा असून त्यासाठी १००० गोणी माती आणि वाळू मिश्रित वापरण्यात आल्या असल्याची माहिती डॉ.प्रमोद पाटील यांनी प्रत्यक्ष दैनिक स्वराज्य तोरण शी बोलताना दिली .
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना आपली सह्याद्री पतसंस्था ही फक्त आर्थिक देवाण घेवाण म्हणजे फक्त आर्थिक व्यवहारापुर्ती मर्यादित कार्य करत नाही तर अनेक सामाजिक, समाजोपयोगी कार्यासाठी सह्याद्री पतसंस्था अग्रेसर असते.उदा. आरोग्य शिबीर, पूरग्रस्त मदत, मुख्यमंत्री सहाय्यता निधी मदत, वृक्षारोपण कार्यक्रम, वनराई बंधारा बांधकाम, गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत असो. अशा अनेक सामाजिक कार्यात सह्याद्री पतसंस्थेचा सिंहाचा वाटा असतो. या वसुंधरेचे अनंत ऋण आपणावर आहेत. ‘पाणी म्हणजे जीवन’ आणि त्या अनुषंगाने सर्व सहकारी सदस्य यांच्या सर्वांच्या श्रमदानातून, सहभागातून ‘पाणी अडवा – पाणी जिरवा’ या संकल्पनेतून पर्यावरण स्नेही वनराई बंधारा प्रकल्प बांधण्याचं महत्वाचं कार्य सालाबादप्रमाणे या ही वर्षी संस्थेने हाती घेतलं आणि पूर्ण केले असे भिवंडी तालुक्यातील सहकार महर्षी तथा सह्याद्री पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. विश्वासजी थळे यांनी यावेळी सांगितले. वसुंधरेचे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी सह्याद्री पतसंस्थेच्या सर्व संचालक, कर्मचारी व दैनंदिन प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या शुभ प्रसंगी भिवंडी तालुक्यातील सहकार महर्षी तथा सह्याद्री पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. विश्वासजी थळे , सचिव डॉ.प्रमोद पाटील, श्री. हनुमान माळी आणि सर्व संचालक उपस्थित होते. तसेच लायन्स क्लब च्या अध्यक्षा सौ. शितल सुधीर देशमुख ,सौ जयश्री प्रमोद पाटील ,श्री सुधीर देशमुख, दांडेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. वाघ ,जिल्हा परिषद शिक्षिका सौ सुमती सुनिल पाटील ,केंद्र प्रमुख श्री. सुनिल पाटील लिओ क्लब अध्यक्ष स्नेहा आडेप ,सर्व लिओ क्लब मेंबर , टिळक चौक मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री रामदास पाटील, लायन डॉक्टर विवेक जोशी ,हेमेंद्र जैन शिक्षक, विद्यार्थी वर्ग व पर्यावरप्रेमीं सर्व उपस्थीत सदस्यांचे सहयाद्री पतसंस्थेच्या वतीने सचिव डॉ. प्रमोद पाटील यांनी आभार मानले . सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री बाळकृष्ण पाटील ,श्री महादेव पाटील, श्री राजेंद्र पाटील ,श्री नरेंद्र पाटील, भिवंडी पंचायत समितीचे विस्ताराधिकारी श्री इंद्रजीत काले यांनी विशेष सहकार्य केले.