29.9 C
Madhya Pradesh
October 15, 2026
Bundeli Khabar
IMG 20211115 WA0012
महाराष्ट्र

श्रमजीवी संघटनेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
भिवंडी : श्रमजीवी संघटना येवई गाव कमेटीच्या वतीने वर्धापन दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात गावकमेटीच्या नामफलकाचे उद्घाटन,गावात संघटना आणणाऱ्या ४,वेठबिगार यांचा सन्मान करून 3 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच १० खावटी किट वाटप करण्यात आल्या.कार्यक्रमात चवळी करांदे नाश्ता देण्यात आला.तसेच गौरीनाच घेऊन कार्यक्रमाचे समारोप करण्यात आला. या कार्यक्रमाला संघटनेच्या कार्यध्यक्षा स्नेहा दुबे-पंडित,भिवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री. सचिन कुलकर्णी ,भिनार आश्रमशाळेचे मुख्याध्यापक श्री.सावंत ,ठाणे जिल्हा उपाध्यक्षा संगिता भोमटे,भिवंडी ता.शहर अध्यक्ष सागर देसक,माजी भिवंडी तालुका अध्यक्ष गोविंद देसक,तालुका उपाध्यक्ष तानाजी लहांगे,प्रदीप चौधरी,तालुका सचिव मोतीराम नामकुडा,तालुका कातकरी घटक सचिव अमोल मुकणे,तालुका महिला ठिणगी सचिव उत्कर्षा कारवे,कवाड झोनप्रमुख विलास शेलार,भिनार झोनप्रमुख कमला गुलूम,भिनार झोन सचिव राजू कुडवा,येवई गावचे समाजसेवक सुनिल वखारे,येवई गावकमेटी प्रमुख अनंता माळी,सक्रिय कार्यकर्ते रतन भोईर,रविंद्र कांबडी,दत्ता कासार,रमेश भुयाल,शांता लहांगे,बळीराम भामरे,लक्ष्मण हाडळ,रेखा चौधरी व मोठया संख्येने सभासद उपस्थित होते.या कार्यक्रमाची प्रस्तावना सविता देसक यांनी केली.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शनअमोल मुकणे यांनी केले.


Bundelikhabar

Related posts

हा अभिनय माझ्या वडिलांना अर्पण, अनुपम खेर यांची ‘कू’ वर इमोशनल पोस्ट

Bundeli Khabar

आबकारी विभाग के छापा में 50 लाख का माल बरामद

Bundeli Khabar

“आज़ाद” के टीजर में दमदार दिखे अजय देवगन के साथ अमन देवगन और राशा थडानी

Bundeli Khabar
error: Content is protected !!