22.8 C
Madhya Pradesh
September 12, 2026
Bundeli Khabar
IMG 20220502 WA0001
खेल

टाटा आयपीएल – अटीतटीच्या लढतीत लखनौची सरशी

Bundelikhabar

10 / 100 SEO Score

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टाटा आपीएल २०२२ चा पंचेचाळीसावा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. लखनौ सुपर जायंट्सने ६ धावांनी हा सामना जिंकला. लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली.
लखनौ सुपर जायंट्सकडून कर्णधार के. एल. राहुलने सर्वाधिक धावा काढल्या. त्याने ४ चौकार आणि ५ षटकार यांच्या सहाय्याने ५१ चेंडूंत ७७ धावा काढल्या. त्याला शार्दुल ठाकूरने बाद केले. दीपक हुडाने ६ चौकार आणि १ षटकार यांच्या सहाय्याने ३४ चेंडूंत ५२ धावा काढल्या. त्याला शार्दुल ठाकूरने स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलबाद केले. क्विंटन डी कॉकने ३ चौकार आणि १ षटकार यांच्या सहाय्याने १३ चेंडूंत २३ धावा काढल्या. त्याला शार्दुल ठाकूरने बाद केले. मार्कस स्टॉइनिसने बिनबाद १७ धावा काढल्या. शार्दुल ठाकूरने ४-०-४०-३ गडी बाद केले. लखनौ सुपर जायंट्सने १९५/३ असा धावांचा भलामोठा डोंगर उभा केला.

यह भी देखें: टाटा आयपीएल – चेन्नईने १३ धावांनी सामना जिंकला

प्रत्युत्तरादाखल दिल्ली कॅपिटल्सकडून कर्णधार ऋषभ पंतने ७ चौकार आणि १ षटकार यांच्या सहाय्याने ३० चेंडूंत ४४ धावा काढल्या. त्याचा मोहसीन खानने त्रिफाळा उध्वस्त केला. अक्षर पटेलने शेवटपर्यंत चिवटपणे झुंज दिली. त्याने १ चौकार आणि ३ षटकार यांच्या सहाय्याने २४ चेंडूंत बिनबाद ४२ धावा काढल्या. त्याने सामन्याच्या शेवटच्या षटकात दोन षटकार मारले पण ३ चेंडूंवर एकही धाव न काढल्याने दिल्लीला हाती आलेला सामना गमावावा लागला. मिशेल मार्शने प्रत्येकी ३ चौकार आणि षटकारांच्या सहाय्याने ३७ धावा काढल्या. त्याला कृष्णाप्पा गौथमने बाद केले. रॉवमन पॉवेलने ३ चौकार आणि २ षटकार यांच्या सहाय्याने २१ चेंडूंत बिनबाद ३५ धावा काढल्या. त्याला मोहसीन खानने बाद केले. कुलदीप यादवने बिनबाद १६ धावा काढल्या. पण दिल्लीला ६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. मोहसीन खानने १६/४, कृष्णाप्पा गौथमने २३/१, रवी बिश्नोईने २८/१, दुष्षमंथा चमिराने ४४/१ गडी बाद केले.
मोहसीन खानला सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. त्याने १६/४ महत्त्वपूर्ण गडी बाद केले होते.


Bundelikhabar

Related posts

राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत मुंबईच्या विन्स पाटील यांची सुवर्ण कामगिरी

Bundeli Khabar

लखनौ सुपर जायंट्सचा रोमहर्षक विजय

Bundeli Khabar

Judo Federation of India’s National Judo Competition

Bundeli Khabar
error: Content is protected !!