37.9 C
Madhya Pradesh
May 20, 2024
Bundeli Khabar
Home » आदर्श इलेव्हन, पनवेल संघ ठरला “बादशहा”
महाराष्ट्र

आदर्श इलेव्हन, पनवेल संघ ठरला “बादशहा”

भाईंदर (गुरुदत्त वाकदेकर) : मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित भव्यदिव्य तिसर्‍या पर्वात पनवेलच्या आदर्श इलेव्हन या संघाने विजेतेपद पटकावले. स्टेशन क्रिकेट पद्घतीने खेळवलेल्या ह्या स्पर्धेत ९६ संघांनी सहभाग नोंदवला होता. अर्थात १०५६ खेळाडूंना ह्या स्पर्धेमध्ये आपले कौशल्य सिद्ध करता आले, याचे श्रेय जाते ह्या स्पर्धेचे उत्तम आयोजन नियोजन करणार्‍या मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या प्रमुख सल्लागार राजु पाटील, अध्यक्ष उमेश मांजरेकर, सचिव चंद्रकांत शिंदे, खजिनदार सुरेश राणा आणि सर्वच पदाधिकार्‍यांना.
युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भाईंदर नवघर येथील बादशहा क्रीडांगणावर आयपीएलच्या राजस्थान रॉयल्स संघांकडून खेळलेला मराठमोळा प्रवीण तांबे खास उपस्थित होता. सत्काराच्या वेळी प्रवीणने युवकांशी संवाद साधताना सांगितले की मैदानात असताना आपलं शंभर टक्के योगदान द्या. क्रिकेट हा खेळ एकट्याचा नसून सांघिक खेळ आहे. तुम्ही दिलेलं योगदानच तुमचा संघ अपराजित रहाण्याकरिता बळ देत असतं. पुढे त्यांनी आयपीएलमध्ये घेतलेल्या हॅटट्रिकच्या प्रश्नावर त्यांनी खूपच महत्वाचे सांगितले की, मी हॅटट्रिक मिळवली त्यापेक्षा आमचा संघ तो सामना जिंकू शकला याचा आजही मला जास्त आनंद होत आहे.
सचिव चंद्रकांत शिंदे यांनी सर्वच संघांचे आभार मानले. आपल्या मनोगतात त्यांनी मुंबई क्रिकेट अ‍सोसिएशन ह्या क्रिकेटच्या शिखर संस्थेसारखं कार्य करण्यासाठी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशन प्रयत्नशील असल्याचं विनम्रपणे नमूद केलं. येणाऱ्या काळात अजून भव्यदिव्य स्पर्धा भरविण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. गुरुदत्त वाकदेकर यांच्या सहकार्यामुळे व्होकार्ड रूग्णालयाची टीम त्यांच्या रुग्णवाहिकेसह संपूर्ण दिवस खेळाडूंना सुरक्षित ठेवण्यासाठी उपस्थित होती. अशाप्रकारची घटना पश्चिम उपनगरात पहिल्यांदाच होत अ‍सल्यामुळे टेनिस क्रिकेटसाठी आज एक महत्वपूर्ण दिवस असल्याचं त्यांनी सांगितलं.
प्रथम पारितोषिक ‘आदर्श इलेव्हन, पनवेल’ आणि द्वितीय पारितोषिक ‘एस.के., अर्नाळा विरार’ या संघांना मिळाले. तर ‘जितू पॅकर, भाईंदर’ या संघास शिस्तबद्घ संघांचे पारितोषिक मिळाले. स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा सन्मान आदर्श इलेव्हन, पनवेलच्या अक्षय पवारला तर अंतिम सामन्यातला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा सन्मान आदर्श इलेव्हन, पनवेलच्याच मयुर महानोर यांना मिळाला. सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा सन्मान क्रितीश इलेव्हन, अंधेरीच्या रोहन साळुंखे, सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा सन्मान एस.के., अर्नाळा विरारच्या राहुल पाटील तर सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा सन्मान जय अंबे, गिरगाव संघाच्या ऋषभ दर्जी याला मिळाला.
स्पर्धेसाठी करुणाकर कोटीयन, अमोल वेतोस्कर यांनी निष्पक्षपणे पंचांची भूमिका पार पाडली. गुणफलक चोख आणि शिस्तबद्घ पद्घतीने मांडणी करण्यात तरबेज असलेले राजेश सोलंकी यांनी उपयुक्तता सिद्ध केली. तर शब्दांची अचूक फेक आणि पकड ज्यांना सहज शक्य होते असे पोलीस निरीक्षक राजेश खोपकर ऊर्फ मॉण्टी आणि मनिष पाटील यांनी स्पर्धेचं समयसूचक धावतं समालोचन केलं.
मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या प्रमुख सल्लागार राजु पाटील, अध्यक्ष उमेश मांजरेकर, सचिव चंद्रकांत शिंदे, खजिनदार सुरेश राणा, करुणाकर कोटीयन, नितीन घोरपडे, नागेश जाधव, राजु साठम, नवनाथ गाडवे, अविनाश जाधव, विजु तळेकर, किशोर शिंदे, प्रसाद येरूणकर, अमित गोलतकर, बंटी कांबळी, अस्लम सरगुरू, मुकेश भंडारी, अशोकन मुथू, अनिल गोलतकर, सुरेश महाडीक, प्रशांत म्हात्रे, हरीश शेट्टी, गुरूप्रसाद पांचाळ, साइ सुवर्णा, कल्याणी घोरपडे यांच्या अथक परिश्रमामुळे ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडली.

Related posts

तकनीशियनों के साथ साथ कलाकारों को मिलेगा सस्ते में घर

Bundeli Khabar

एसटी बस चालक और ट्रैफिक पुलिस के बीच विवाद रोड़ पे लगा जाम

Bundeli Khabar

शातिर चोर को पुलिस ने किया गिरफ्तार

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!