38.4 C
Madhya Pradesh
May 16, 2024
Bundeli Khabar
Home » जॉन-दिव्या यांची सुंदर केमिस्ट्री दर्शविणारे सत्यमेव जयते 2 चित्रपटातील ’मेरी जिंदगी है तू’ हे गाणे आज झाले रिलीज
महाराष्ट्र

जॉन-दिव्या यांची सुंदर केमिस्ट्री दर्शविणारे सत्यमेव जयते 2 चित्रपटातील ’मेरी जिंदगी है तू’ हे गाणे आज झाले रिलीज

गायत्री साहू/महाराष्ट्र

मुम्बई : मिलाप मिलन झवेरीचा सत्यमेव जयते 2 हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. दमदार ट्रेलरनंतर, निर्मात्यांनी आज “मेरी जिंदगी है तू” चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज केले आहे. जॉन आणि दिव्या यांच्यातील सुंदर केमिस्ट्री हे या रोमँटिक गाण्याचे वैशिष्ट्य आहे. हे दोघं पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.
अतिशय हुशार जुबिन नौटियाल आणि नीती मोहन यांनी गायलेले हे गाणे, मनोज मुंतशिर यांनी लिहिले आहे आणि रोचक कोहली यांनी संगीतबद्ध केले आहे. हे गाणे प्रेमाच्या अभिव्यक्तीचे त्याच्या शुद्ध स्वरूपात वर्णन करते.
मेरी जिंदगी है तू हे चित्रपटाच्या अल्बममधील जॉन अब्राहमचे सर्वात आवडते गाणे आहे या गाण्याबद्दल बोलताना तो म्हणतो, “मेरी जिंदगी हे गाणे तुमच्या हृदयाला स्पर्श करते. जेव्हा मी ते पहिल्यांदा ऐकले तेव्हा मी लगेचच या गाण्याच्या प्रेमात पडलो. या रोमँटिक गाण्याचे शूटिंग करत असतानाही, सेटवर दिव्यासोबत मी खूप छान वेळ घालवला. जुबिन नौटियाल आणि नीती मोहन यांनी मनोज मुंतशिर यांच्या शब्दांसह गायन केले, आणि यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही.
दिव्या खोसला कुमारने म्हणते कि, “मेरी जिंदगी है तू एक गाणे आहे जे शुद्ध रोमान्स आहे आणि पूर्णपणे प्रेमाने भरलेले आहे. मी शूट केलेला हा सर्वात भावनिक आणि रोमँटिक नंबर आहे आणि तो तुमच्या मनाला नक्कीच स्पर्श करेल!”
दिग्दर्शक मिलाप झवेरी म्हणतात, “मेरी जिंदगी है तू मध्ये जॉन आणि दिव्याची स्क्रीन प्रेझेन्स पाहणे ही कौतुकास्पद गोष्ट आहे. त्यांच्या भूमिकेतील प्रेमाचे चित्रण करण्यासाठी हा उत्तम रोमँटिक ट्रॅक आहे.”
भूषण कुमार, कृष्ण कुमार (टी-सिरीज), मोनिषा अडवाणी, मधु भोजवानी, निखिल अडवाणी (एमे एंटरटेनमेंट) निर्मित सत्यमेव जयते 2 गुरुवारी, २५ नोव्हेंबर २०२१ रोजी थिएटरमध्ये रीलीज होणार आहे.

Related posts

माफ़िया पत्रकार बीनू वर्गिस के खिलाफ हफ्ताखोरी की तीसरी एफआईआर दर्ज ।

Bundeli Khabar

स्वर’लते’ची भैरवी

Bundeli Khabar

महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी व अग्निशिखा मंच का हिंदी दिवस कार्यक्रम संपन्न

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!