30.2 C
Madhya Pradesh
October 17, 2026
Bundeli Khabar
IMG 20211029 WA0006
व्यापार

गोदरेज नूपुरच्या नैसर्गिक मेंदी आधारित हेअर कलर उत्पादनासाठी ऑन बोर्ड म्हणून शिल्पा शेट्टी दाखल

Bundelikhabar

गायत्री साहू/महाराष्ट्र

मुंबई : गोदरेज कन्झ्युमर्स प्रॉडक्ट्स लिमिटेड (जीसीपीएल)चा सर्वाधिक मोठा हिना ब्रँड असणाऱ्या गोदरेज नूपुरने आज लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिची गोदरेज नूपुर नैसर्गिक मेंदी आधारित केसांच्या रंगासाठी ब्रँड अँबेसिडर म्हणून निवड केल्याचे जाहीर केले. शहरी आणि ग्रामीण बाजारपेठेत ब्रँडच्या मेहेंदी आधारित पावडर रूपातील हेअर कलर उत्पादनाची रुजवात करण्यासाठी हा सहयोग करण्यात आला आहे. उत्पादनाची वैशिष्ट्ये ठळकपणे पुढे आणण्यासाठी आणि त्याची दृश्यात्मकता वाढविण्यासाठी क्रिएटीव्हलँड एशियाची संकल्पना असलेल्या नवीन टीव्हीसी मोहिमेचे अनावरण गोदरेज नूपुरने केले.
अभिनेत्री, उद्योजिका आणि फिटनेस प्रेमी म्हणून सुप्रसिद्ध असणारी शिल्पा नैसर्गिक राहणीमानाची खरी पुरस्कर्ती आहे आणि तिच्या स्वतःच्या जीवनशैलीतून तिने चांगले उदाहरण घालून दिले आहे. त्यातूनच तिने गोदरेज नूपुरच्या मेहेंदी आधारित हेअर कलरची परिपूर्ण निवड केली आहे. या उत्पादनातील मूळ आधारभूत घटक मेंदी हा असून आवळा, कोरफड, जास्वंद, शिकेकाई, कडुनिंब, मेथी, भ्रिंगराज, जटमानसी, ब्राह्मी या ९ औषधी वनस्पतींचे नैसर्गिक गुणधर्म समाविष्ट केलेले आहेत. हे नैसर्गिक घटक पांढरे केस झाकून केसांना चमकदार आणि नैसर्गिक तजेला देतात.
या सहयोगाबद्दल बोलताना शिल्पा शेट्टी म्हणाली, “भारतीय संस्कृतीची भक्कम मूळे असणारा आणि देशात हेअर कलर उत्पादनांची मुहूर्तमेढ रोवणारा गोदरेज हा समृद्ध परंपरा असणारा ब्रँड आहे. गोदरेज नूपुर नैसर्गिक मेंदी आधारित केसांच्या रंगासाठी ब्रँड अँबेसिडर म्हणून निवड झाल्यामुळे त्यांच्या मंडळावर येताना मला खूप आनंद होत आहे. गोदरेज नूपुरला ग्राहकांच्या केसांच्या रंगाची गरज समजते. माझ्यासकट सर्व ग्राहकांना उत्पादनात नैसर्गिक घटकांसाठी असणारे प्राधान्य ते समजून घेतात. पहिल्यांदाच केसांना रंग लावताना भीती वाटत असणाऱ्या ग्राहकांसाठी गोदरेज नूपुर नैसर्गिक मेंदी आधारित केसांचा रंग खूप उपयुक्त आहे कारण त्यामध्ये केसांना रंग देण्यासाठी सुरक्षीत नैसर्गिक घटकांचा वापर करण्यात आला आहे.”
गोदरेज कन्झ्युमर्स प्रॉडक्ट्स लिमिटेडचे भारत आणि सार्क विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कटारिया या सहयोगाबद्दल बोलताना म्हणाले, “केसांच्या आरोग्यासाठी आणि पोषणासाठी गोदरेज नूपुर मेंदी भारतातील घराघरांत वापरली जाते. आमचे अगदी अलिकडचे गोदरेज नूपुर नॅचरल हिना बेस्ड हेअर कलर उत्पादन हे आमच्या ब्रँड पोर्टफोलिओचा विस्तार आहे. वापरायला झटपट आणि सोप्या अशा पावडर रूपातील उत्पादनात मेंदीचे नैसर्गिक फायदे आहेत. नैसर्गिक तरीही स्टायलिश या ब्रँडच्या रुपात अभिनेत्री शिल्पा शेट्टी व्यवस्थित बसत असल्यामुळे गोदरेज नूपुर नॅचरल हिना बेस्ड हेअर कलर उत्पादनाचा चेहरा म्हणून तिची निवड करताना आम्हांला खूपच आनंद होत आहे. फक्त १० रुपये किंमत असणारे हे उत्पादन सर्वाना परवडू शकेल असे आहे. आमचे मेंदी आधारित हेअर कलर उत्पादन पहिल्यांदाच केसांना रंग देण्याची इच्छा असणाऱ्या आणि त्यासाठी नैसर्गिक घटकांना पसंती देणाऱ्या ग्राहकांसाठी आहे.”
गोदरेज नूपुर नॅचरल हिना बेस्ड हेअर कलर उत्पादन पावडर रुपात असून नैसर्गिक काळा (१० ग्रॅम पॅक) आणि नैसर्गिक ब्राऊन (१५ ग्रॅम पॅक) अशा दोन रंग छटांमध्ये उपलब्ध असून त्याची किंमत फक्त १० रुपये आहे. सर्वसाधारण जनरल स्टोअर्स मध्ये हे हेअर कलर उत्पादन उपलब्ध आहे.

टीव्हीसी लिंक: https://www.youtube.com/watch?v=ilNZ1saDOEs


Bundelikhabar

Related posts

पेपरफ्राई ने शुरू की 24 घंटे फर्नीचर डिलीवरी सेवा

Bundeli Khabar

क्लैनकनेक्ट.एआय की सेवाएं ब्रैंड और एजेंसियों के लिए अब निःशुल्क

Bundeli Khabar

गोदरेज प्रोसेस इक्विपमेंट गुजरात के दहेज इकाई का करेगा विस्तार, वित्तवर्ष 2025 तक राजस्व दोगुना करने का लक्ष्य

Bundeli Khabar
error: Content is protected !!