30.5 C
Madhya Pradesh
July 27, 2026
Bundeli Khabar
IMG 20211028 WA0004
महाराष्ट्र

ग्लेनमार्कने भारतातील टाइप २ मधुमेही प्रौढांसाठी स्वस्त दरात बाजारात आणणारी पहिली कंपनी

Bundelikhabar

संतोष साहू/महाराष्ट्र

मुंबई : ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेडने (ग्लेनमार्क), आपला नवीन पेटंटसंरक्षित, जागतिक स्तरावरील संशोधनातून विकसित करण्यात आलेला सोडिअम ग्लुकोज को-ट्रान्सपोर्टर इनहिबिटर (SGLT2i)- रेमोग्लिफ्लोझिन एटाबोनेट आणि डीपीपी४ हा आणखी एक व्यापक स्तरावर वापरला जाणारा इनहिबिटर (डिपेप्टिडील पेप्टिडेस ४ इनहिबिटर)- व्हिल्डाग्लिप्टिन यांचे मेटफॉर्मिनसोबत (टाइप २ मधुमेहींच्या उपचारात सर्वोच्च प्राधान्य दिले जाणारे औषध) केलेले फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन बाजारात आणले आहे. हे फिक्स्ड ड्रग कॉम्बिनेशन टाइप २ मधुमेहाच्या व्यवस्थापनासाठी निर्देशित आहे. या मिश्रणात (कॉम्बिनेशन) रेमोग्लिफ्लोझिन (१०० मिलिग्रॅम) + व्हिल्डाग्लिप्टिन (५० मिलिग्रॅम) + मेटाफॉर्मिन (५००/१००० मिलिग्रॅम) यांचा निश्चित डोसच्या स्वरूपात समावेश आहे आणि रुग्णामधील ग्लायकेमिक नियंत्रण सुधारण्यासाठी हे औषध दिवसातून दोनदा घेणे अनिवार्य आहे. ग्लेनमार्कने हे औषध रेमो एमव्ही आणि रेमोजेन एमव्ही अशा दोन ब्रॅण्डनेम्सखाली बाजारात आणले आहे.
रेमोग्लिफ्लोझिन + व्हिल्डाग्लिप्टिन + मेटफॉर्मिन यांचे फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन बाजारात आणणारी ग्लेनमार्क ही जगातील पहिली कंपनी आहे आणि हे एफडीसी औषध उपलब्ध असलेला भारत हा पहिला देश आहे. ग्लेनमार्कला फिक्स्ड डोस कॉम्बिनेशनच्या उत्पादन व मार्केटिंगसाठी सप्टेंबर २०२१च्या अखेरीस, डीसीजीआयने (भारतातील औषध मंजुरी प्राधिकरण) मंजुरी दिली.
जगभरात एसजीएलटी२ आणि डीपीपी४ हे इनहिबिटर्स टाइप २ मधुमेहाच्या व्यवस्थापनात प्राधान्याने वापरले जाणारे पर्याय म्हणून उदयाला येत आहेत. भारतातील मधुमेहाच्या रुग्णांना नवीनतम उपचार कमी खर्चात उपलब्ध करून देण्याच्या कामात ग्लेनमार्क आघाडीवर आहे.
“एसजीएलटी२आय + डीपीपी४आय + मेटफॉर्मिन असे एफडीसी टाइप २ मधुमेहाच्या व्यवस्थापनातील प्राधान्यप्राप्त उपचार म्हणून जगभरात उदयाला येत आहेत.ग्लेनमार्कने मधुमेहावर लक्ष केंद्रित केले आहे आणि भारतातील मधुमेहाच्या रुग्णांना नवीनतम उपचार पर्याय उपलब्ध करून देण्यात आम्ही आघाडीवर आहोत. अत्याधुनिक, विस्तृत संशोधनावर आधारित असे हे नवोन्मेषकारी फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन परवडण्याजोग्या दरात बाजारात आणता आले याचा आम्हाला अभिमान आहे. या औषधामुळे रुग्णांमधील उपचारपालनाचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढेल तसेच भारतातील टाइप २ मधुमेह नियंत्रणाबाहेर गेलेल्या रुग्णांना ग्लायकेमिक व अतिरिक्त ग्लायकेमिक लाभ पुरवण्यात या औषधाची मदत होईल,” असे कंपनीच्या इंडिया फॉर्म्युलेशन्स विभागाचे समूह उपाध्यक्ष आलोक मलिक म्हणाले.


Bundelikhabar

Related posts

सिडको के उपाध्यक्ष और प्रबंध निदेशक डॉ. संजय मुखर्जी द्वारा विशेष समिति का किया गठन

Bundeli Khabar

पांचवी और छठी रेलवे लाइन के निर्माण का कार्य रोक दिया जाएगा -आवास मंत्री जितेंद्र आव्हाड

Bundeli Khabar

पिस्तूलमधून गोळी घालत असल्याचा नाट्य रूपांतरित व्हिडीओ ‘इन्स्ट्राग्राम’ द्वारे व्हायरल नवघर पोलिसांची कारवाई

Bundeli Khabar
error: Content is protected !!