26.3 C
Madhya Pradesh
September 10, 2026
Bundeli Khabar
IMG 20211027 WA0007
मनोरंजन

महेंद्र राजे यांना सर्वोत्कृष्ट पंच पुरस्कार

Bundelikhabar

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमॅच्युअर किकबॉक्सिंग असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने दिनांक २४ ऑक्टोबर रोजी मोरया मंगल कार्यालय चिंचवड, पुणे येथे कॅडेट ज्युनिअर आणि सिनियर राज्यस्तरीय किकबॉक्सिंग निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन पिंपरी-चिंचवड किकबॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील ७३२ खेळाडू, ५६ पंच, २९ प्रशिक्षक सहभागी झाले होते. यावेळी मुंबई सबर्बन किक बॉक्सिंग असोसिएशन, मुंबई उपनगरचे तांत्रिक संचालक महेंद्र राजे यांना सर्वोत्कृष्ट पंच पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .

या स्पर्धेचे उद्घाटन पिंपरी चिंचवड झोन २ चे डीसीपी मंचक इप्पर, महाराष्ट्र किकबॉक्सिंग असोसिएशनचे चेअरमन संतोष बारणे, नगरसेवक शिवसेना पिंपरी चिंचवडचे शहर प्रमुख सचिन भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. याप्रसंगी महाराष्ट्र किकबॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष संतोष म्हात्रे, उपाध्यक्ष मंदार पनवेलकर, संतोष खंदारे आदी मान्यवर उपस्थित होते.


Bundelikhabar

Related posts

कंगना रनौत निर्देशित व अभिनीत फिल्म ‘इमरजेंसी’ 24 नवंबर 2023 को होगी रिलीज़

Bundeli Khabar

नई प्रतिभाओं को सही मंच प्रदान करते हैं दादासाहेब फाल्के फिल्म फाउंडेशन के अध्यक्ष अशफाक खोपेकर

Bundeli Khabar

‘रॉकेट्री: द नांबी इफेक्ट’ में आर माधवन का सर्वश्रेष्ठ प्रदर्शन

Bundeli Khabar
error: Content is protected !!