कल्याण: कचोरे (प्रभाग क्र.४५) मधील कामांना सौ. रेखा राजन चौधरी यांच्या पाठपुराव्यामुळे आज खऱ्या अर्थाने यश प्राप्त झाले आहे. आज कल्याण लोकसभा क्षेत्राचे खासदार माननीय श्रीकांत शिंदे (खासदार)यांनी आपल्या प्रयत्नांनी स्थानिक नगरसेविका रेखा राजन चौधरी यांना सुचविल्याप्रमाणे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील कचोरे कोळीवाडा (प्रभाग क्र.४५) या प्रभागात पायवाटा आणि स्मशानभूमी कामासाठीअनुक्रमे २० आणि ६० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
या कामांना गती आणि निधी प्राप्त झाल्याने सौ. रेखा राजन चौधरी आणि कचोरे कोळीवाडा ग्रामस्थ समाधान व्यक्त करत आहेत.
या कार्यक्रमादरम्यान खासदार श्रीकांत शिंदे, गोपाळ लांडगे, रेखा राजन चौधरी, बाशकर चौधरी मोहन भोईर नवनाथ मुकादम सदानंद चौधरी तसेच भाजपा आणि शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Home » खासदार श्रीकांत जी शिंदे वार्ड क्र.45 साठी यांनी सौ. रेखा राजन चौधरी यांच्या पाठपुराव्याला निधी उपलब्ध करू दिल्याबद्दल त्याचे आभार व्यक्त केले
next post
Related posts
- Comments
- Facebook comments