30.9 C
Madhya Pradesh
October 6, 2024
Bundeli Khabar
Home » हरिता दि ग्रीन फूटप्रिंट फेलोशिपकडून मुंबईभरातील ५०० उद्यानांचा अहवाल सादर
महाराष्ट्र

हरिता दि ग्रीन फूटप्रिंट फेलोशिपकडून मुंबईभरातील ५०० उद्यानांचा अहवाल सादर

संतोष साहू/महाराष्ट्र
मुंबई : एमसीजीएम आणि मिनिस्‍ट्री ऑफ मुंबई’ज मॅजिक यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने प्रोजेक्‍ट मुंबईने नुकतेच बीएमसीला मुंबई मध्‍ये ५०० हून अधिक उद्यानांचे मूल्‍यांकन करण्‍यासंदर्भातील संशोधनाच्‍या निष्‍पत्ती सादर केल्‍या. हे संशोधन हरिता दि ग्रीन फूटप्रिंट फेलोशिपचा भाग आहे, ज्‍यांनी सार्वजनिक कृतीला चालना देण्‍यासाठी आणि मुंबईतील सर्वोत्तम हरित जागांप्रती कार्य करण्‍यासाठी मुंबईतील ८४ तरूणांना प्रशिक्षित करण्‍यासह त्‍यांच्‍या सहयोगाने काम केले.
३ महिन्‍यांच्‍या फेलोशिप कालावधीदरम्‍यान आर्किटेक्‍चर, शहरी नियोजन, डिझाइन, सामाजिक कार्य व पर्यावरण रचना अशा विविध पार्श्‍वभूमींमधील तरूणांनी शहरी सस्‍टेनेबिलिटी चॅम्पियन्‍स बनण्‍यासाठी पुढाकार घेतला. त्‍यांचे कार्य हरित व राहण्‍यास अनुकूल शहर निर्माण करण्‍याप्रती योगदान देईल. विविध दिवशी आयोजित करण्‍यात आलेल्‍या व्‍याप‍क प्रशिक्षण उपक्रमाच्‍या माध्‍यमातून फेलोजना तंत्रज्ञान डेटाबेस निर्माण करण्‍याचे शिक्षण देण्‍यात आले आणि डेटा गोळा करण्‍यासोबत मॅपिंग करण्‍याच्‍या प्रक्रियेची माहिती देण्‍यात आली.
या प्रत्‍येक उद्यानांना श्रेणींसोबत युनिक कोड्स देण्‍यात आले आहेत. फेलोशीपने उद्यानांना ३ गुणांनुसार श्रेणीबद्ध केले, जेथे अव्‍वल उद्यानांना ए श्रेणी देण्‍यात आली. मूल्‍यांकन करण्‍यात आलेल्‍या ५०० उद्यानांपैकी १८ टक्‍के उद्यानांना ए श्रेणी (अपवादात्‍मक उत्तम स्थिती) देण्‍यात आली, तर ७० टक्‍के उद्यानांना बी श्रेणी (उत्तम स्थिती) आणि १२ टक्‍के उद्यानांना सी श्रेणी (सुधारणा करण्‍याची गरज) देण्‍यात आली. सर्वेक्षण करण्‍यात आलेली ५०० उद्याने शहरातील एकूण उद्यानांपैकी जवळपास तीन-चतुर्थांश आहेत. या सर्वेक्षणामधून मुंबईच्‍या हरित जागांच्‍या एकूण स्थितीबाबत सुस्‍पष्‍ट व सुलभ माहिती मिळते.
सिटीझनशीप रिस्‍पॉन्‍स सर्व्‍हेनुसार ८३ टक्‍के नागरिकांच्‍या मते, उद्यानांमधील प्रकाशयोजना उत्तम असण्‍यासोबत उत्तमरित्‍या देखरेख ठेवली जाते प्रमुख शिफारसींपैकी एक म्‍हणजे किमान ४०% नागरिकांनी ही उद्याने विकलांग वेक्तीसाठी अनुकूल असावीत असे मत वेक्त केले. ३००० चौरस फूटांहून अधिक जागा असलेल्‍या विभागांमधील मोठ्या उद्यानांसंदर्भात उद्यानांमध्‍ये किंवा उद्यानांच्‍या आसपासच्‍या परिसरामध्‍ये सार्वजनिक शौचालये असण्‍याच्‍या शिफारशी करण्‍यात आल्‍या आहेत. सर्व उद्यानांसाठी पिण्‍याच्‍या पाण्‍याची सुविधा व योग्‍य स्‍वच्‍छतेसंदर्भात देखील शिफारस करण्‍यात आली आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे, जेथे ९० टक्‍के नागरिक आशावादी असण्‍यासोबत त्‍यांना उद्यान उत्तम स्थितीत राहण्‍यासंदर्भात आणि उद्यानांमध्‍ये सर्वोत्तम सुविधा मिळण्‍यासंदर्भात एमसीजीएमवर विश्‍वास आहे. किमान ७० टक्‍के नागरिकांसाठी उद्यान त्‍यांच्‍या परिसरामध्‍ये १० ते १५ मिनिटे पायी चालण्‍याच्‍या अंतरावर असल्‍यासारखे वाटले, जे उत्तम नियोजन आहे आणि मुंबईमध्‍ये प्रति दरडोई मोकळ्या जागेची उपलब्‍धता देखील दिसून येते.
मुंबईचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी म्हणाले की आम्‍हाला बीएमसीच्या उद्याने व मनोरंजनपूर्ण मैदांनाच्‍या या व्‍यापक यादी व ग्रेडिंगमधून लाभ होईल. प्रोजेक्‍ट मुंबईने सबमिट केलेला अहवाल ही उद्याने व मनोरंजनपूर्ण मैदांनाचा विकास करण्‍याचे भावी धोरण नियोजित करण्‍यामध्‍ये आणि उद्यानांचे मेन्‍टेनन्‍स व व्‍यवस्‍थापनासाठी योग्‍य आराखड्याची अंमलबजावणी करण्‍यामध्‍ये अद्ययावत पाया ठरेल.
प्रोजेक्‍ट मुंबईच्‍या प्रोजेक्ट्स हेड रूपाली वैद्य म्हणाल्या की या उपक्रमाने विविध तंत्रज्ञान पार्श्‍वभूमींमधील फेलोजना प्रशिक्षण घेण्‍यासोबत मुंबईतील उद्यानांबाबत माहिती करून घेण्‍याची संधी दिली. मुंबईच्‍या हरित जागांप्रती त्‍यांच्‍या आवडीमुळेच ५०० उद्यानांचा हा प्रचंड डेटाबेस तयार झाला आणि समुदायांनी दिलेला प्रतिसाद प्रेरणादायी होता. हा टेक्निकल अहवाल उद्यान विभागासाठी मुंबईच्‍या हरित जागांमध्‍ये नवीन उद्यानांकरिता अपग्रेडेशन प्‍लान तयार करण्‍यासाठी साह्य करेल. मुंबईच्‍या तरूणांसोबत काम करण्‍याचा अनुभव संपन्‍न राहिला आणि फेलोजनी त्‍यांच्‍या स्‍वत:च्‍या अध्‍ययनांनुसार संशोधनाच्‍या वैध अभिप्रायामध्‍ये योगदान दिले.

Related posts

इंधन, गॅसच्या किंमती वाढवून मोदी सरकारकडून जनतेचे रक्तशोषण: नाना पटोले

Bundeli Khabar

१.२५ लाख वितरकांना कमाईची संधी देणार ‘इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१

Bundeli Khabar

मुंबई प्रदेश भाजपा चित्रपट नाट्य आघाड़ी में डॉ ऋचा सिंह की उपाध्यक्ष पद पर नियुक्ति

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!