38.9 C
Madhya Pradesh
May 17, 2024
Bundeli Khabar
Home » १.२५ लाख वितरकांना कमाईची संधी देणार ‘इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१
महाराष्ट्र

१.२५ लाख वितरकांना कमाईची संधी देणार ‘इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१

१.२५ लाख वितरकांना कमाईची संधी देणार ‘इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१’
~ ११-१३ ऑगस्ट दरम्यान होणार आयोजन ~

मुम्बई / जितेंद्र शर्मा
मुंबई : भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. या ग्रासलेल्या यंत्रणेला बळ देण्यासाठी देशातील आघाडीच्या बी2बी ऑनलाइन मार्केटप्लेस प्लॅटफॉर्म ट्रेडइंडिया आता आपले सब-व्हेंचर गेटडिस्ट्रिब्युटर्स डॉट कॉम सोबत आणखी एक फ्लॅगशिप ट्रेड इव्हेंट ‘इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१’ चे आयोजन ११-१३ ऑगस्ट दरम्यान करण्यासाठी सज्ज आहे. जेणेकरून १.२५ लाखांहून अधिक वितरकांसाठी २००+ ब्रँड आणि हजारो उत्पादनांशी जोडून कमाईच्या आशादायी संधी वाढतील.
ट्रेड इंडिया आणि गेटडिस्ट्रिब्युटर डॉट कॉम हे देशभरातील वितरकांना एक सहज व्हर्चुअल प्लॅटफॉर्म प्रदान करत आहेत, जेणेकरून त्यांना स्वत:च्या घरातून किंवा वैयक्तिक जागेवरून उपयुक्त ब्रँडसोबत डिजिटल पद्धतीने जोडण्यास मदत मिळू शकेल. अशा प्रकारे त्यांचा वेळ आणि प्रवासाचा खर्च वाचेल. ही संपूर्णत: डिजिटल व्हर्चुअल परिषद सध्याच्या कठीण काळात उपयुक्त अशा बिझनेस संधी देण्यास मदत करेल. अशा प्रकारे भारतभरातील वितरकांना ब्रँडसोबत जोडण्यात मदत मिळेल.
यासोबतच, या आयोजनाद्वारे सर्व सहभागींना अनेक महत्त्वपूर्ण लाभ मिळतील. जसे की, आकर्षक सेवा आणि सुविधायुक्त डिजिटल स्टॉल मिळतील. या आयोजनात १५,००० पेक्षा जास्त बिझनेस गुंतवणूकदार सहभागी होण्याची आशा आहे. तसेच 90% पेक्षा जास्त लोकांनी आधीपासूनच आपल्या पसंतीनुसार रजिस्ट्रेशन केले आहे.
ट्रेड इंडियाचे सीईओ संदीप छेत्री म्हणाले, “ही महामारी भारतीय बिझनेस कम्युनिटीसाठी खूप आव्हानात्मक ठरली आहे आणि त्यातही उभे आपण उभे आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे. उद्योग क्षेत्राला महामारीच्या धक्क्यातून सावरण्यात मदतीकरिता ट्रेडइंडियाने तिचा सब व्हेंचर गेटडिस्ट्रिब्युटर्स डॉट कॉम सोबत या उल्लेखनीय व्हर्चुअल प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. जेणेकरून असंख्य डिस्ट्रिब्युटर्सना योग्य ब्रँडशी जोडण्यात मदत होईल. तसेच त्यांना अखिल भारतीय स्तरावर कमाईच्या पुरेशा संधी प्रदान केल्या जातील. आम्हाला विश्वास आहे की, या आयोजनाद्वारे आकर्षक संधी आणि देशातील सर्व बिझनेस यंत्रणेकरिता नव्या नेतृत्वाच्या संदर्भात एक मोठे यशस्वी कार्य पार पडेल.”

Related posts

फिल्म प्रडूसर और प्रडक्शन हाउस की लापरवाही की वजह से हुआ हादसा.

Bundeli Khabar

“महाराष्ट्र स्वाभिमान गौरव” पुरस्कारांचं वितरण

Bundeli Khabar

स्वयं भूनागेश्वर देवस्थान चोरवणे भाविकांसाठी बंद

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!