22.4 C
Madhya Pradesh
October 6, 2024
Bundeli Khabar
Home » एन आर सी कॉलनी परिसरातील रस्त्याची दुरुस्ती दोन दिवसात
महाराष्ट्र

एन आर सी कॉलनी परिसरातील रस्त्याची दुरुस्ती दोन दिवसात

एन आर सी कॉलनी परिसरातील रस्त्याची दुरुस्ती दोन दिवसात
माजी सभापती दया शेट्टी यांनी घेतली कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांची भेट.

मोहने : एन आर सी कॉलनी परिसरातील मुख्य रस्त्याची दुरवस्था झाल्याची बातमी प्रकाशित झाली होती.
या बातमीची माजी सभापती दया शेट्टी यांनी दखल घेतली असून लागलीच त्यांनी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांची भेट घेऊन रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.
एन आर सी कॉलनी परिसरातील मुख्य रस्त्यांची दुरवस्था झाली होती येथील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. खड्ड्यांमधून वाहन चालकांना वाहन चालविणे जिकरीचे झाले होते तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ निर्माण होत होती या धुळीमुळे नागरिकांना सर्दी खोकल्याचा त्रास होत होता. अशी बातमी प्रकाशित होताच दया शेट्टी यांनी कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांची भेट घेऊन तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली. कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांनी तातडीने आदेश काढून दोन दिवसात रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल असे माजी सभापती दया शेट्टी यांना आश्वासन दिले आहे. त्यामुळे एन आर सी कॉलनी परिसरातील मुख्य रस्त्याची दुरुस्ती दोन दिवसात होणार असल्याने नागरिकांची दिवाळी आनंदात जाणार आहे.
रस्ता दुरुस्त होणार असल्याने नागरिकांनी माजी सभापती दया शेट्टी यांच्या कार्याचे कौतुक केले असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.

Related posts

जीवनधारा संघ संस्था के राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद पाण्डेय की अध्यक्षता में अहम बैठक सम्पन्न

Bundeli Khabar

दुनिया देखने के सपने को पूरा करने के लिए भारतीय दिन-प्रतिदिन के खर्चों में कटौती: कायक

Bundeli Khabar

राज्यपाल सन्मानित दिनेश भाई ठक्कर यांचा नागपूर येथे जीवन गौरव पुरस्काराने सन्मान

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!