23.3 C
Madhya Pradesh
October 6, 2024
Bundeli Khabar
Home » मुंबई पोलिस दलाचा वाघ दिपक सावंत यांचे अपघाती निधन
महाराष्ट्र

मुंबई पोलिस दलाचा वाघ दिपक सावंत यांचे अपघाती निधन

ब्यूरो/महाराष्ट्र
मुंबई : क्रोफॅर्ड मार्केट येथील माता रमाबाई पोलिस वसाहतीत रहाणारे मुंबई पोलिस दलातील जाँबाज पोलिस हवालदार स्व.दिपक सावंत यांचे २३/०९/२०२१ गुरूवारी सकाळी जे.जे.रूग्णालयात देहावसान झाले.परमपिता परमेश्वर स्व. दिपक सावंत यांच्या पवित्र आत्म्यास शांती व सदगती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना या दु:खातून सावरण्याची ताकत देवो हिच परमेश्वराला विनंती. स्व.श्री.दिपक सावंत यांनी आपले शालेय शिक्षण मुंबई गिरगांवमधील चिकित्सक समूह शिरोडकर हायस्कूल मध्ये पुर्ण केले.तद्नंतर त्यांनी मुंबई पोलिस दलात विधिवत प्रशिक्षण घेऊन मुंबई पोलिस दलात हवालदार या पदावर नियुक्ती होऊन काम करण्यास सुरूवात केली.मुंबई पोलिस दलात काम करताना पोलिस कमांडोचेही कठीण ,खडतर प्रशिक्षण घेतले.एम.आर आय पोलिस ठाणे, पोलिस प्रोटेक्शन ब्राँच ,वि.प.मार्ग पोलिस ठाणे बिट प्रमुख, गुन्हे विभाग अशा विविध पोलिस ठाण्यामध्ये ऊत्कुष्ट काम त्यांनी केले होते.स्व.दिपक सावंत यांचे वडिलही मुंबई पोलिस दलात हवालदार म्हणून कार्यरत होते.तसेच प्रत्येक पोलिस ठाण्यामध्ये तेथील अधिकारी, कर्मचारी, अंमलदार, हवालदार, शिपाई त्याचबरोबर ते काम करत असलेल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील समस्त प्रतिष्ठीत, राजकीय लोकांशी त्यांचे मैत्रीपुर्ण संबंध होते.त्यांचा खास स्वभाव म्हणजे मित्रांची अडचण कुठलीही असो अशावेळी कसलीही पर्वा न करता मित्रांना जशी जमेल तशी मदत ते करायचे.त्यांचा मित्र वर्ग फार मोठा असून सर्व मित्रांचे ते लाडके होते।

स्व.दिपक सावंत हे एक अतिशय कर्तव्यदक्ष, प्रामाणिक, बेखौफ व्यक्तीमत्वाचे होते.रस्त्यात महिलांच्या गळ्यातील चेन ,मंगळसुत्र हिसकावुन चोरणार्या चोरांना त्यांनी चांगलेच वठणीवर आणले होते.अश्या चोरांचा पाठलाग करताना त्यांच्या खांद्याला जबर दुखापत झाली होती तरी पण त्या दुखापतीची पर्वा न करता ते दुसर्या दिवशी पोलिस ठाण्यात कामावर हजर झाले होते.त्यांनी कधीच खोट्या गोष्टींना थारा दिला नाही.त्यांनी एक जवाबदार पोलिस म्हणून आपले काम चोख बजावले.त्यामुळे सर्वच त्यांचा आदर करायचे.अशा ह्या मुंबई पोलिस दलात कार्यरत असता मागच्या आठवड्यात त्यांच्या बाईकला अपघात होऊन ते जखमी झाले होते त्यांना तातडीने जे.जे.रूग्णालयात दाखल केले होते.दिनांक २३/०९/२०२१ रोजी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. आणि मुंबई पोलिस दलाने पोलिस दलातील ढाण्या वाघ आणि मित्रांनी त्यांचा लाडका जिवासखा कायमचा गमावला .त्यांच्या या निधनाने मुंबई पोलिस दलात व त्यांच्या मित्रपरिवारात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांची चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले।

Related posts

नकली पुलिस का कारनामा: लाखों के जेबर ले कर रफूचक्कर

Bundeli Khabar

समाजसेवक गौरव अनिल शाह को मिली द अमेरिकन यूनिवर्सिटी यूएसए और डीपीआईएएफ से डॉक्टरेट की डिग्री

Bundeli Khabar

वसईत एकाच दिवशी २० ठिकाणी होणार महारक्तदान

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!