27.6 C
Madhya Pradesh
May 3, 2024
Bundeli Khabar
Home » भिवंडी तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी दहा कोटींची मदत जमा
महाराष्ट्र

भिवंडी तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी दहा कोटींची मदत जमा

किशोर पाटील/महाराष्ट्र
अंबाडी : ठाणे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी मध्ये भिवंडी शहर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.अशा नुकसानग्रस्तांना दसरा दिवाळी सणा पूर्वी राज्य शासनाने दिलासा देण्याचे काम केले असून पूरग्रस्तांना मदत देणे साठी तब्बल 10 कोटी रुपये तहसीलदार कार्यालयात शासना कडून जमा करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार अधिक पाटील यांनी दिली आहे .
जुलै महिन्यातील पूर परिस्थिती नंतर शेतीचे पंचनामे सुरू करीत असतानाच पुराचे पाणी शिरल्याने नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून करून ठेवण्यात आले होते .त्याचा अहवाल शासनाला सादर केल्या नंतर शासनाने ही 10 कोटी रुपयांची मदत पुरग्रस्तांसाठी दिली आहे.पूर परिस्थिती निवळल्या नंतर भिवंडी शहरा सोबतच ग्रामीण भागातील सुमारे 8 हजार 500 घरांचे पंचनामे करण्यात आले असून सदरची रक्कम येत्या पंधरा दिवसात थेट नुकसानग्रस्तांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती तहसीलदार अधिक पाटील यांनी दिली आहे .
सुरवातीला कोरोना व त्यानंतर अतिवृष्टी मुळे अनेकांना आर्थिक परिस्थितीचा सामना लागत असतानाच पूरग्रस्त कुटुंबियांना प्रत्येकी सुमारे दहा हजार रुपये नुकसानभरपाई पंधरा दिवसात दिली जाणार असल्याने या कुटूंबियांना दिलासा मिळणार आहे .

Related posts

नारी शक्ति को नमन – डॉ. सुमाया रेश्मा

Bundeli Khabar

मुंबईत आज महारोजगार मेळाव्यात ८ हजार ६०८ जागांवर नोकरीची संधी

Bundeli Khabar

मुंबईत लालबागमधील वन अविघ्न पार्क इमारतीला मोठी आग

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!