28.2 C
Madhya Pradesh
September 28, 2026
Bundeli Khabar
IMG 20211018 WA0014
महाराष्ट्र

भाजपामध्ये गेलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांची घरवापसी-जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या हस्ते प्रवेश

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
भिवंडी : मुरबाड तालुक्यातील भाजपचे ठाणे ग्रामीण उपाध्यक्ष सचिन घरत यांनी २०१४ मध्ये निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजपाचा झेंडा हाती घेतला होता.मात्र त्यांची राजकीय पार्श्वभुमी व जडण घडण मूळ काँग्रेसमधूनच झाली.त्यामुळे त्यांनी घरवापसी करण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे मुरबाड मध्ये भाजपला धक्का बसला आहे.ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या हस्ते मुंबई नाशिक महामार्गावरील जनसंपर्क कार्यालयात सचिन घरत यांनी आपल्या शेकडों कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.यामध्ये भिवंडी लोकसभा क्षेत्रातील मुरबाड कल्याण ग्रामीण,टिटवाळा,खडवली मधील कार्यकर्त्यांनी प्रवेश केला असुन येणा-या काही दिवसांतच लोकसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने प्रवेश होणार असल्याची माहिती सचिन घरत यांनी दिली आहे.
प्रवेश सोहळ्यासाठी महेंद्र घरत,सचिन सावंत,किसन पवार,संजय गुप्ता,विजय गोखने,कैलास महाजन,दिपक‌ गव्हाळे,दिलीप हरड,दिपक‌ तुपलोंडे,दिपक वाघ,कैलास सोनावणे,रामचंद्र गोखने,विकास माळी इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.


Bundelikhabar

Related posts

बृहन्मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी गोवा ट्रायलॉथॉन यशस्वी केली

Bundeli Khabar

सीनियर आईपीएस अधिकारी भूषण कुमार उपाध्याय होंगे महाराष्ट्र होमगार्ड के नए डीजी

Bundeli Khabar

स्वाति वासुदेवन बनी खान एकेडमी इंडिया की राष्ट्रीय निदेशक

Bundeli Khabar
error: Content is protected !!